टाटांसारखे आदर्शवत उद्योजक घडावे- सतीश मगर
आंत्रप्रेन्युअर्स इंटरनॅशनल तर्फे उत्कृष्ट उद्योजक पुरस्कार प्रदान

पुणे (प्रतिनिधी) दिवंगत जे आर डी टाटा यांचे जीवनमूल्ये, नितीमूल्ये, विकासाची दूरदृष्टी असणारे,देशासाठी मोठे योगदान देणारे महान उद्योजक होऊन गेले.जे आर डी टाटांसारखे आदर्शवत उद्योजक घडावे. उत्कृष्ट उद्योजक होण्यासाठी कॅपिटल, कॅरेक्टर,कम्युनिकेशन, कमिटमेन्ट म्हणजेच “c-4” या चतूसूत्रीचा अवलंब केला पाहिजेत. असे मत प्रसिद्ध उद्योजक सतीश मगर यांनी व्यक्त केले.
आंत्रप्रेन्युअर्स इंटरनॅशनलच्या वतीने भारतरत्न जेआरडी टाटा यांच्या जयंती निमित्त औद्योगिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या उद्योजकांना उत्कृष्ट उद्योजक पुरस्कराचे कोथरूड येथे करण्यात आले.यावेळी ते बोलत होते.
यावेळी व्यसपीठावर आंत्रप्रेन्युअर्स इंटरनॅशनलचे अध्यक्ष अमोल जाधव, सचिव सुभाष माईणकर,खजिनदार सुनील थोरात आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी औद्योगिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल अनिकेत लाटकर, उज्वला गोसावी(कृषी),राजेश कुलकर्णी (संशोधन),
सतवीर सिहाग (सेवा क्षेत्र),डॉ.राजेश मणेरीकर (पर्यावरणपूरक) यांना एक्सलन्स पुरस्कार देवून गौरविण्यात आले.
उद्योजकांना सहकार्य करणारी “टूल क्लिनिक” आणि सार्वजनिक सफाई करणारी”स्वच्छ ” या दोन संस्थांना “उत्कृष्ट कार्य गौरव पुरस्कार”देवून सन्मानित केले.
यावेळी आंत्रप्रेन्युअर्स इंटरनॅशनलच्या कार्याची माहिती देणाऱ्या स्मरणीकेचे प्रकाशन करण्यात आले.
श्री.मगर पुढे म्हणाले कि,आज परदेशात भाडे तत्वावर कंपन्या उभारण्याकडे कल जास्त आहे.याचा विचार आपणही केला पाहिजेत.आयटी उद्योग उद्योगाचा कणा आहे तर सेवा क्षेत्र चंचल आहे. मात्र सॉफ्टवेअर उद्योगाला कोअर इंडस्ट्रीज ला पोषक वातावरण निर्माण करणे गरजेचे आहे.अत्याधुनिक इंडस्ट्रियल कॉम्प्लेक्स भारतामध्ये होण्याची गरज आहे.यासाठी मी सहकार्या साठी तत्पर आहे.
तर चाकण मध्ये औद्योगिक हब झाले असते…
मी ८ वर्षा पूर्वी चाकण जवळ एका गावात औद्योगिक हब उभारण्यासाठी जागा खरेदी केली होती.त्या गावात गेल्यावर तिथे एका महाशय म्हणाले कि, उद्योग सुरू करण्यापूर्वी आमच्या सरपंचाला भेटावे लागेल. कशाठी असं विचारल्यावर ते म्हणाले अमुकचा लेबर सप्लायर, तमुकचा जेसीबी,आमक्याचं बांधकाम कंत्राट आहे. मग मी काय करायचे? असा प्रश्न विचारला तर तुम्ही फक्त पैसे द्यायची. मला ते मान्य न झाल्याने घेतलेली जागा ना नफा ना तोटा या तत्वर विकून टाकली. अन्यथा आज मोठी औद्योगिक सीटी उभी राहिली असती. अशा गावातील चुकीच्या प्रवृत्ती ला आळा घातला पाहिजेत.अन्यथा उद्योग स्थलांतर होईल. असा अनुभव सांगितला.
अध्यक्ष श्री. जाधव म्हणाले कि,
आंत्रप्रेन्यूअर्स इंटरनॅशनलकडून दरवर्षी भारतरत्न दिवंगत जेआरडी टाटा यांचा जन्मदिवस उद्योजक दिन म्हणून ३१ वर्षांपासून साजरा केला जात आहे.
आंत्रप्रेन्यूअर्स इंटरनॅशनलचे पुणे, चिंचवड, निगडी आणि बारामती येथे चार क्लब कार्यरत असून त्यांचे १५० हून अधिक उद्योजक सदस्य सक्रिय आहेत. विविध क्षेत्रातील उद्योजकांमध्ये संवाद, विविध व्यवसायिक कार्यक्रमांशी संबंधित व्याख्याने आणि कार्यशाळा, प्रदर्शनात सहभाग, वार्षिक पुरस्कार देवून गौरव करणे, विविध देशांमधील औद्योगिक संघटनांशी करार करणे असे उपक्रम नियमितपणे आयोजित केले जातात.
निगडी शाखेचे अध्यक्ष पदाची सूत्रे मावळते अध्यक्ष सागर दाणी यांनी नवनिर्वाचित अध्यक्ष फ्रेडरिक झेवियर यांना सुपूर्त केला.पिं.चिं. सर्वेश पवार यांच्याकडून सुमेधा जळगावकर यांना अध्यक्ष पदाची सूत्रे देण्यात आले.पुणे शाखेचे अध्यक्ष पदाची सूत्रे पुरुषोत्तम यांच्याकडून सुनील थोरात यांनी स्वीकारली.बारामती शाखेचे अध्यक्ष राजेंद्र जगताप यांच्याकडून प्रमोद काकडे यांच्याकडे अध्यक्ष पदभार सुपूर्त केला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऍड महेश गजेंद्रगडकर यांनी केले व आभार मानले.
फोटो –
१) सतीश मगर, अध्यक्ष अमोल जाधव, सुभाष माईणकर,सुनील थोरात, महेश गजेंद्रगडकर पुरस्कारार्थी समवेत
२) डावीकडून सुभाष माईणकर, सतीश मगर, अमोल जाधव, सुनील थोरात




