औद्योगिक

औद्योगिक परिसरातील रस्त्यांची दुरुस्ती न केल्यास चाकण बंद आंदोलन करू

उद्योग आघाडीचे अध्यक्ष अतुल इनामदार यांचा इशारा

पिंपरी (प्रतिनिधी) जागतिक पातळीवर पोचलेले चाकण औ‌द्योगिक परिसरातील रस्त्यांची अक्षरशः चाळणी झाली आहे यामुळे औद्योगिक कंपन्याना वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे. नादुरुस्त रस्त्यांची त्वरित दुरुस्ती करावी अन्यथा चाकण बंद आंदोलन करण्यात येईल, असा इशारा भाजप उद्योग आघाडीचे अध्यक्ष अतुल इनामदार यांनी आज दिला आहे. या संदर्भात पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकराणा चे मुख्य अभियंता रिनाज पठाण यांना निवेदन देवून मागणी केली आहे.यावेळी निगडी येथील महानगर प्राधिकरण कार्यालयात महानगर आयुक्त डॉ योगेश म्हसे यासोबत बैठक घेऊन हि बाब लक्षात आणून दिली.

या बैठकीला भाजप उद्योग आघाडीचे शहराध्यक्ष अतुल इनामदार,खेडचे आमदार बाबाजी काळे, चाकण इंडस्ट्रियल फेडरेशनचे अध्यक्ष दिलीप बटवाल,उपाध्यक्ष श्रीपती खुणे, मलेश तोडकरी, कुणाल कड आदी उपस्थित होते.
या परिसरात हजारो राष्ट्रीय बहू राष्ट्रीय कंपन्या आहेत. आपल्या परिसरात चांगल्या सुविधा उपलब्ध करून देणे हे प्रशासनाची जबाबदारी आहे. अन्यथा अंतराराष्ट्रीय पातळीवर देशाची प्रतिमा मलीन होईल. नवीन गुंतवणूकदार येणार नाही.
चाकण औ‌द्योगिक परिसरातील रस्त्यांची स्थिती अत्यंत खराब आहे. खड्डे, पाण्याचा निचरा न होणे व वाहतुकीतील अडथळ्यांमुळे कामगार, उ‌द्योजक व नागरिक त्रस्त आहेत.याशिवाय निघोजे परिसरात रस्त्यावर मोठं मोठी वाहने उभे करून वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्या वाहन चालकांवर कारवाई करावी अशी मागणी केली.

प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी स्वतः चाकण औद्योगिक परिसराची पाहणी करून ठोस निर्णय घ्यावा. 21 जुलै 2025 रोजी प्रशासनाने एक महिन्याच्या आता रस्त्यांची दुरुस्ती न केल्यास चाकण बंद आंदोलन करण्यात येईल. असा इशारा दिला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button