शैक्षणिक

राजर्षी शाहू कॉलेजच्या प्राध्यापकांनी दिले विदेशातील विद्यापीठात धडे

जागतिक स्तरीय कामगिरीचे कौतुक

पिंपरी (प्रतिनिधी) जेएसपीएमच्या ताथवडे येथील राजर्षी शाहू महाविद्यालयाच्या स्थापत्य अभियांत्रिकी विभागातील प्राध्यापकांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर आपले कौशल्य सिद्ध करत संस्थेचा झेंडा परदेशातही फडकवला आहे. विभागातील डॉ. राजकुवर डुबल (संरचना शास्त्र), डॉ. मीनाक्षी शर्मा (दळणवळण अभियांत्रिकी) आणि डॉ. सौरव कर (मृदुबल अभियांत्रिकी ) यांना व्हीएसबी टेक्निकल युनिव्हर्सिटी, ऑस्ट्रावा, चेक रिपब्लिक या नामांकित संस्थेत अध्यापनासाठी विशेष आमंत्रण दिले होते.

या दौऱ्यात त्यांनी चेक टेक्निकल युनिव्हर्सिटी, प्राग येथे स्थापत्य विभागाशी शैक्षणिक करार केला. याशिवाय, टेक्निकल युनिव्हर्सिटी ड्रेस्डन, जर्मनी येथे रेल्वे अभियांत्रिकीतील प्रकल्प अभ्यासासाठीही या तिघांची निवड झाली.

भूकंप प्रतिबंधक तंत्रज्ञानात आघाडीवर असलेल्या बर्लिन मधील “गर्ब “या औद्योगिक समूहानेही या तिघांना त्यांच्या संशोधनाची सादरीकरणे पाहण्यासाठी आमंत्रित केले होते. इटलीतील युनिव्हर्सिटी ऑफ सन्निओ आणि युनिव्हर्सिटी ऑफ फ्लोरेन्स येथेही त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
या आंतरराष्ट्रीय शैक्षणिक मोहिमेसाठी जेएसपीएम संस्थेचे संस्थापक डॉ. तानाजी सावंत यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. संचालक अनिल भोसलेआणि रवी जोशी यांनी या उपक्रमाला सहकार्य केले. तसेच प्राचार्य डॉ. संतोष भोसले, उपप्राचार्य अविनाश देवस्थळी, डॉ. अविनाश बडधे, आणि आंतरराष्ट्रीय संबंधांचे डीन डॉ. विनोदकुमार यांचे महत्त्वपूर्ण योगदान लाभले.
भारतीय बुद्धिमत्तेला जागतिक स्तरावर मिळालेली ही दाद निश्चितच गौरवास्पद आहे!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button