सामाजिक

महाराजा अग्रसेन किचनतर्फे कुलदेवी मंदिराच्या प्रतिकृतीचे अनावरण

अग्रोहा-तीर्थ नावाने आळंदीत उभारणार भव्य मंदिर

आळंदी (प्रतिनिधी) महाराजा अग्रसेन किचन ट्रस्टच्या वतीने अग्रोहा तीर्थ, श्री क्षेत्र आळंदी- चऱ्होली येथे उभारण्यात येत असलेल्या कुलदेवी मंदिराच्या प्रतिकृतीचे अनावरण अत्यंत भक्तिमय वातावरणात व उत्साह पार पडले.
हे अनावरण सामाजिक कार्यकर्ते रोहतास बंसल (हांडेवाडी) आणि राधेश्याम अग्रवाल (विश्रांतवाडी) यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी पुणे जिल्ह्यातील अग्रवाल समाजातील अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष सीए कृष्णलाल बंसल म्हणाले कि,महाराजा अग्रसेन किचन ट्रस्ट ऑक्टोबर २०१८ पासून सामाजिक, धार्मिक अशा क्षेत्रात कार्यरत आहे.
ट्रस्टचा एक महत्वाचा उपक्रम म्हणजे पुणे व पिंपरी-चिंचवड येथील ७ रुग्णालयांमध्ये दररोज गरजू रुग्णांना मोफत जेवण पुरवण्याची सेवा, जी २०१८ पासून अविरतपणे सुरू आहे. ‘अग्रोहा तीर्थ’ या प्रकल्पाशी अधिकाधिक अग्रवाल कुटुंबांनी जोडावे, असे आवाहन केले. हे तीर्थस्थान संत ज्ञानेश्वरांच्या समाधीपासून केवळ ३ कि.मी. अंतरावर आहे.
हा प्रकल्प एक राष्ट्रीय पातळीवरील आध्यात्मिक केंद्र ,आणि भाविकांचे श्रद्धास्थान बनेल, असा विश्वास अध्यक्ष सीए बन्सल यांनी व्यक्त केला.
या अग्रोहा तीर्थ भव्य मंदिरात
भगवान अग्रसेन व माता माधवी, भगवान विठ्ठल व रुक्मिणी माता, कुलदेवी महालक्ष्मी, वैष्णोदेवी माता, बाबा खाटू श्याम, शिव परिवार, माता बालासुंदरी, माता मनसा देवी, शितला माता, चितानेवाली माता, पठरीवाली माता, भाऊपुरवाली माता, कैला माता, चामुंडा माता, भनबोरीवाली माता आणि भैरव बाबा या देवतांच्या भव्य मूर्ती असणार आहे.

यावेळी ७ नवीन ट्रस्टींनी महाराजा अग्रसेन किचन ट्रस्टमध्ये समावेश केल्याने कार्याला बळकटी मिळणार आहे.

सचिव मुकेश रामावतार अग्रवाल व खजिनदार संजीव ओमप्रकाश अग्रवाल यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button