
पिंपरी (प्रतिनिधी) पिंपरी-चिंचवडच्या प्रेरणा कपूर हिने चार्टर्ड अकाउंटंट (सीए ) अंतिम परीक्षेत घवघवीत यश मिळवत संपूर्ण भारतातील गुणवत्ता यादीत २९वा क्रमांक पटकावला आहे. दि इन्स्टिट्यूट ऑफ चॅर्टर्ड अकौंटन्ट ऑफ इंडिया ने घेतलेल्या परीक्षेचा १ मार्च २०२६ रोजी जाहीर झाला. या निकालात अत्यंत कठीण समजल्या जाणाऱ्या परीक्षेत तिचे हे यश विशेष ठरले.
या यशाचे श्रेय तिने आपल्या सातत्यपूर्ण मेहनतीसोबतच आई-वडिलांचा भक्कम पाठिंबा मिळाला.आणि आर्टिकलशिपदरम्यान आकुर्डीतील सीए प्राजक्ता चिंचोळकर व सीए ऋषिकेश चिंचोळकर यांचे मार्गदर्शन लाभले.




