पिंपरी चिंचवडआरोग्यविज्ञान - तंत्रज्ञान

विलर्न इंडिया शैक्षणिक लीडरशिप” समिटला प्रतिसाद

ताण - तणावात जगणे चिंताजनक बाब- इटकर

ताण – तणावात जगणे चिंताजनक बाब- इटकर

पिंपरी (प्रतिनिधी)- ‘ विलर्न इंडिया’च्या वतीने ‘रिमेम्बरिंग मी फाउंडेशन’च्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या नॅशनल एज्यूकेशन लीडरशिप समिटमध्ये शिक्षण क्षेत्रात विशेष योगदान देणाऱ्या शहरातील महिला शिक्षकांना वुमन एज्युकेशनल लीडर्स पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले.
रावेत येथे आयोजित केलेल्या या शैक्षणिक परिषदेत ताण-तणाव व्यवस्थापनावर समुपदेशन करणाऱ्या “विलर्न इंडिया” ऍप आणि करियर कौन्सीलिंग, सोशल इमोशनल लर्निंग पुस्तिकेचे प्रकाशन यावेळी करण्यात आले.

यावेळी महाराष्ट्र इकोनॉमिक डेव्हलपमेंट कौन्सिलचे उपाध्यक्ष सचिन इटकर, पिं-चिं एज्युकेशन ट्रस्टचे कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई,मानसोपाचार तज्ञ डॉ. किशोर गुजर, पिं -चिं सायन्स पार्कचे संचालक प्रवीण तुपे, यारी ग्रुपचे अध्यक्ष ज्ञानेश्वर काळभोर, विलर्न इंडियाच्या संस्थापक / संचालिका रंजना पवार, संचालक सुधीर पाटील, संचालक भास्कर मर्गज , संचालक उमेश ढोणे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी श्री.इटकर म्हणाले कि,
विलर्न’ हे व्यासपीठ शिक्षकांना समुपदेशक बनण्याची एक उत्तम करिअरची संधी उपलब्ध आहे. दर सातपैकी एका किशोरवयीन मुलाला मानसिक समस्यांचा सामना करावा लागतो; नैराश्य, चिंता, मानसिक अस्वस्थता आणि मनस्थितीत होणारे बदल यांसारख्या समस्या या सामान्य आहेत. केवळ २% मुले आपल्या समस्यांबाबत शिक्षकांशी संवाद साधतात, तर जवळपास ७०% विद्यार्थी समुपदेशकांपर्यंत पोहोचू शकत नाहीत. विलर्न इंडिया ‘ व्यासपीठाद्वारे प्रत्येक शिक्षकाने प्रशिक्षण घेणे आवश्यक आहे. जर विद्यार्थ्यांना योग्य वयात समुपदेशन मिळाले, तर त्याचा देशाला समाजाला नक्कीच फायदा होईल.आज तरुणाई ताण तणावातून जात आहे.ही चिंताजनक बाब आहे.अशा परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी विलर्न हा ऍप नक्कीच उपयुक्त ठरेल असा विश्वास व्यक्त केला.
प्रा.देसाई म्हणाले कि,एआयच्या जगात अध्यापन पद्धतीत अमूलाग्र बदल घडून येत आहे. हे शिक्षण क्षेत्रासमोर मोठे आव्हान असणार आहे. शिक्षणाचे भविष्य घडवणाऱ्या आणि विद्यार्थ्यांच्या पिढ्यांना प्रेरणा देणाऱ्या महिला शिक्षणतज्ज्ञांची दूरदृष्टी, त्यांच्यातील समर्पण वृत्ती आणि अग्रगण्य कार्याला वाहून घेणाऱ्या शिक्षकांचा सन्मान करणे ही कौतुकास्पद बाब आहे.अशा शब्दांत विलर्न इंडियाचे कौतुक केले.
डॉ.गुजर यांनी मुलांचे आणि प्रौढाचे मानसिक आरोग्याच्या समस्यांचे प्रतिबंध या विषयांवर मार्गदर्शन केले.
पुरस्कारार्थीमध्ये एसएनबीपी आंतरराष्ट्रीय शाळेच्या देवयानी भोसले,एएसएम इन्स्टिट्यूट ग्रुपच्या संचालिका डॉ.मणिमाला पुरी,
अवसरा अकॅडमीच्या संचालक डॉ लक्ष्मी कुमार,
पुणे केंब्रिजच्या विश्वस्त प्रीतम कुंजीर,ऑर्केड शाळेच्या डॉ.नम्रता माझाईल,सायन्स पार्कच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.श्रद्धा खाम्पारिया,मॉडर्न इंग्लिश स्कूलच्या विद्या घाडगे यांचा समावेश आहे.

नॅशनल एज्युकेशन लीडरशिप समिट
“जनरेशन अल्फा आणि जनरेशन झेडसाठी मानसिक आरोग्य आणि नवीन युगातील करिअर – आव्हाने आणि संधी” या विषयावर आयोजित चर्चासत्रात देसाई फौंडेशनचे सीईओ प्रा.अश्विनीकुमार भारद्वाज, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील सायकोलॉजी विभागप्रमुख प्रा. राजेंद्र म्हस्के,डॉ. व्यास मौर्य,मुक्तांगण व्यसनमुक्तीच्या सोनाली काळे हे सहभागी झाले होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन युगांतर बल्लाळ तर आभार भास्कर मर्गज यांनी मानले.
यावेळी सल्लागार सदस्य डॉ. स्वाती देशमुख, डॉ. सुभम जानकर, डॉ. खुशली ओझा, डॉ. रेखा कुमार, डॉ.माजू पुनिया, डॉ. शीतल सोलंकी यांचा सत्कार करण्यात आला.

फोटो ओळ –
ऍपचे लोकार्पण करताना डावीकडून रंजना पवार, सचिन इटकर, डॉ.किशोर गुजर गिरीश देसाई ज्ञानेश्वर काळभोर आदी

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button