आंत्रप्रेन्युअर्स इंटरनॅशनलच्या वतीने मंगळवारी उत्कृष्ट उद्योजक पुरस्कार वितरण
लाटकर, गोसावी, कुलकर्णी, मणेरीकर यांना पुरस्कार जाहीर

पिंपरी (प्रतिनिधी) आंत्रप्रेन्युअर्स इंटरनॅशनलच्या वतीने भारतरत्न जेआरडी टाटा यांच्या जयंती निमित्त औद्योगिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या उद्योजकांना उत्कृष्ट उद्योजक पुरस्कर प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती आंत्रप्रेन्युअर्स इंटरनॅशनलचे अध्यक्ष अमोल जाधव यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
यावेळी प्रसिद्ध उद्योजक सतीश मगर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहे.
हा पुरस्कार सोहळा दि. २९ रोजी सं. ६ वा, महाराष्ट्र एज्यूकेशन सोसायटीचे सभागृह, 131 मयूर कॉलनी, कोथरूड या ठिकाणी संपन्न होणार आहे.
यावेळी औद्योगिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी साक्षी मेडटेक अँड पॅनल्स लि चे अनिकेत लाटकर यांना उत्कृष्ट उद्योजक पुरस्कार
“शेतीतील उत्कृष्ट कार्यासाठी ” क्लाइंबर सिस्टम्सच्या उज्वला गोसावी यांना पुरस्कार प्रदान केला जाईल.
कीट्रॉनिक्सचे संचालक राजेश कुलकर्णी यांना संशोधन आणि नवोन्मेषातील पुरस्कार दिला जाणार आहे.
सेवा क्षेत्रातील पीएफसी लॉजिस्टिक्सचे संचालक सतवीर सिहाग यांना पुरस्कार देण्यात येणार आहे.पूर्णम इको सोल्युशन्सचे संचालक डॉ. राजेश मणेरीकर यांना पर्यावरणपूरक उद्योजक म्हणून पुरस्कार देण्यात येणार आहे.
उद्योजकांना दिशा देणारी “टूल क्लिनिक” आणि
“स्वच्छ ” या दोन संस्थांना “उत्कृष्ट कार्य गौरव पुरस्कार”प्रदान केला जाईल.
आंत्रप्रेन्यूअर्स इंटरनॅशनल विषयी थोडक्यात
उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी ३१ वर्षांपूर्वी आंत्रप्रेन्यूअर्स इंटरनॅशनलची स्थापना करण्यात आली होती.
आंत्रप्रेन्यूअर्स इंटरनॅशनलकडून दरवर्षी भारतरत्न दिवंगत जेआरडी टाटा यांचा जन्मदिवस उद्योजक दिन म्हणून साजरा केला जातो.
आंत्रप्रेन्यूअर्स इंटरनॅशनलचे पुणे, चिंचवड, निगडी आणि बारामती येथे चार क्लब कार्यरत असून त्यांचे १५० हून अधिक उद्योजक सदस्य सक्रिय आहेत. विविध क्षेत्रातील उद्योजकांमध्ये संवाद, विविध व्यावसायिक कार्यक्रमांशी संबंधित व्याख्याने आणि कार्यशाळा, प्रदर्शनात सहभाग, वार्षिक पुरस्कार प्रदान करून गौरव करणे, विविध देशांमधील औद्योगिक संघटनांशी करार करणे असे उपक्रम नियमितपणे आयोजित केले जातात.




