सामाजिक

निगडी लायन्स क्लबच्या अध्यक्षपदी रश्मी नायर”

निगडी(प्रतिनिधी) पिंपरी चिंचवड मधील अग्रमानांकित स्वयंसेवी संस्था लायन्स क्लब पुणे निगडी या क्लब च्या अध्यक्षपदी रश्मी नायर तसेच सचिव पदी मंजिरी कुलकर्णी तर खजिनदारपदी शिवकन्या मुसमाडे यांची नियुक्ती झाली असून त्यांच्या 2025- 26 वर्षातील कार्यकारणी मंडळाचा पदग्रहण समारंभ नुकताच संपन्न झाला.
लायन्स क्लबच्या माजी प्रांतपाल डॉ. ज्योती तोष्णीवाल यांनी अध्यक्षा रश्मी नायर व कार्यकारणी मंडळ यांना जबाबदारीची कल्पना देऊन पदाची शपथ दिली. या प्रसंगी, लायन्स प्रांताचे प्रमुख पदाधिकारी,
रवि सातपुते, शैलजा सांगळे, रवींद्र गोलार, मुकुंद आवटे, मुरलीधर साठे, वसंत कोकणे, प्रीती बोंडे, अनिल भांगडिया, सलीम शिकलगार आदी उपस्थित होते.
निगडी क्लब चे संस्थापक सदस्य, आर. एस. कुमार, एस. एस. तिवारी, जयश्री मांडे यांचा यावेळी सन्मान करण्यात आला.
नव अध्यक्षा रश्मी नायर यांनी आपल्या मनोगत व्यक्त करताना वर्षभरातील नियोजित सेवाकार्य उपक्रमांची माहिती दिली. यात जिल्हा तसेच आंतरराष्ट्रीय सेवाकार्य बरोबर ऑक्सिजन पार्क उभारणे, दृष्टी दान विषयक नया सवेरा कार्यक्रम राबविणे , महिला, गरजू विद्यार्थी व दिव्यांग यांचे साठी भरीव सेवाकार्य करणे तसेच निगडी लायन्स चॅरिटेबल ट्रस्ट चे जागेत समाजपयोगी कायमस्वरूपी प्रकल्प उभा करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.
मावळत्या अध्यक्षा मिनांजली मोहिते यांनी क्लब या सेवाकार्य व प्रकल्पाविषयी माहिती दिली. यासाठी त्यांना, खजिनदार वृषाली सुरवाडे, हर्ष नायर, सलीम शिकलगार, चंद्रशेखर पवार, अशोक येवले, राजीव कुटे, देविदास ढमे, संजय निंबाळकर, ॲड.जनार्दन गावडे व दिलीपसिंह मोहिते, मारुती मुसमाडे आदी यांनी विशेष सहकार्य केले.
पदग्रहण समारंभाचे सूत्र संचालन कृषिकेश मुसमाडे यांनी केले तर आभार शिल्पी कुमार यांनी व्यक्त केले. गत वर्षाचा बेस्ट लायन अवॉर्ड आर. एस. कुमार यांना प्रदान करण्यात आला . या कार्यक्रमात काही प्रातिनिधिक सेवाकार्य ही करण्यात आले. पिस पोस्टर स्पर्धेत प्रथम आलेली मॉडर्न हायस्कूल निगडीची सिद्धी कणसे हिचा ही सन्मान करण्यात आला. या प्रसंगी पिंपरी चिंचवड परिसरातील लायन्सचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button