अनिल मित्तल यांना पिं-चिं सन्मान पुरस्कार
औद्योगिक,सामाजिक क्षेत्रात विशेष योगदान

‘चिंचवड (प्रतिनिधी) येथील न्यूज १४ लाइव्ह’ च्या वतीने आयोजित ‘पिंपरी-चिंचवड सन्मान पुरस्कार ’ सामाजिक आणि औद्योगिक क्षेत्रात कार्य केल्याबद्दल वसंत ग्रुपचे सह व्यवस्थापकीय संचालक अनिल मित्तल यांना प्रदान करण्यात आला.
यावेळी अ भा मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ श्रीपाल सबनीस,महापौर रवि लांडगे, स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे, विरोधी पक्ष नेते भाऊसाहेब भोईर, उपमहापौर शर्मिला बाबर, जेजुरी देवस्थानचे मुख्य विश्वस्त अनिल सौंदडे, साहित्य परिषदेचे शहराध्यक्ष राजन लाखे, अविनाश कांबीकर आदी मान्यवर उपस्थित होते.
‘या दिवाळीत कोणीही भुकेले राहू नये’ या हेतूने
दरवर्षी दिवाळीत १५,००० वंचितांना पाच दिवस पूर्ण जेवण पुरवतात ,
नॅशनल सोशल ग्रुप’ (NSG) च्या माध्यमातून कोविडच्या काळात व्हेंटिलेटर,डायलिसिस मशीन
डिजिटल एक्स-रे मशिन रुग्णांना उपलब्ध करून दिले. रोटरी क्लब ऑफ आकुर्डीच्या माध्यमातून ‘हॅप्पी स्कूल’ बांधून दिले. ८००० हून अधिक वृक्षारोपण करून देखभाल ,नीळकंठेश्वर येथे मंदिराची १२ ज्योतिर्लिंग मंदिर उभारत आहेत.




