सामाजिक

फुले दांपत्यास भारतरत्न मिळणे हा आपला अधिकार आणि हक्कच – जयकुमार गोरे

म. फुले मंडळाकडून मंत्री गोरे यांचा नागरी सत्कार

पिंपरी ( प्रतिनिधी ) म. ज्योतिबा फुले यांची जयंती आली कि सावित्रीबाई आणि म.ज्योतिबा फुले या दांपत्यास भारतरत्न देण्यात यावा, अशी मागणी जोर धरु लागते.मात्र पुरस्कार मागण्यापेक्षा तो आपला अधिकार आणि हक्क आहे.असे प्रतिपादन ग्राम विकास, पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे यांनी केले. चिंचवड येथील महात्मा जोतिबा फुले मंडळाच्या वतीने नामदार गोरे यांचा नागरी सत्कार सोहळा संपन्न झाला. यावेळी ते बोलत होते.

प्रा. मोरे प्रेक्षागृह येथे श्री संत शिरोमणी सावता महाराज संजीवन समाधी सोहळ्या निमित्त विविध पुरस्कार व विद्यार्थी गुणगौरव सोहळा संपन्न झाला.

यावेळी सहा. आयुक्त मनोज लोणकर,सहाय्यक पो निरीक्षक राहुल नामदे, तर लोकसेवा आयोग परीक्षेत यशस्वी झालेले आकाश गोरे, रोहन पिंगळे, विशाल पांढरे, गुणवंत कामगार पुरस्कारप्राप्त साखरचंद लोखंडे, शिवराज शिंदे यांच्यासह ७२ विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून महिला आयोग अध्यक्षा रूपालीताई चाकणकर,राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, खा.श्रीरंग बारणे, आ. शंकर जगताप, माजी नगरसेवक वसंत लोंढे,माजी नगरसेवक भाऊसाहेब भोईर, प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे,संत सावता महाराज यांचे वंशज सावता महाराज वसेकर,माजी महापौर अपर्णा डोके, जेष्ठ नेते भाऊसाहेब भोईर, प्रशांत डोके,सीए सुहास गार्डी,
अध्यक्ष हनुमंत माळी आदी मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी यावर्षीचा संत सावता भूषण पुरस्कार संतोष लोंढे यांना तर संत सावता कृषीरत्न पुरस्कार, हभप मुरलीधर भुजबळ व दिलीप विधाटे या प्रगतिशील शेतकऱ्यांना पुरस्कार प्रदान तसेच तर संत सावता उद्योग रत्न पुरस्कार संजय जगताप यांना प्रदान करण्यात आला. तसेच यावेळी प्रशासकीय खात्यात नियुक्त झालेले नवीन अधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
श्री गोरे पुढे म्हणाले कि, मान खटाव तालुका दुष्काळ मुक्त करण्यासाठी मी २००९ पासून निवडणुकीच्या रिंगणात लढत आहे. एका सामान्य घरातील पोर प्रस्थापितांच्या विरोधात उभे राहून विकासाच्या मुद्द्यावर आपल्याला प्रश्न विचारतो ते प्रस्थापितांना पचत नाही, त्यामुळे मला संपवण्यासाठी सर्व स्तरावर प्रयत्न केले जातात. एवढेच नाही तर मी मंत्री झाल्यावर देखील मंत्रिपद घालवण्यासाठी सर्व यंत्रणा कामाला लावल्या होत्या. असा आरोप एका मोठ्या नेत्याचे नाव न घेता केला. जातगात प्रत्येक निवडणुकीमध्ये माझ्यावर गुन्हे दाखल केलेले आहे.

खा. बारणे म्हणाले कि, देशात सर्व संपन्न असा माझा भव्य वार्डात काम करताना धन्यता वाटते.

चौकटीत
सासरी जातांना मुलीच्या हाती संविधान दया

यावेळी चाकणकर म्हणाल्या कि,
मुली सासरी जाताना त्यांच्या हातात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान द्यावे, कारण मुलींनी संविधान वाचावे यासाठीच सावित्रीने अंगा खांद्यावर शेणा मातीचे गोळे सहन केले. इच्छा होती की यासाठी कारण पुढे जाऊन महिला संविधान वाचतील, असं त्यांना वाटलं होतं. मात्र आज ज्या सत्यवानाची सावित्री पाहीली नाही त्या सावित्रीची वटपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी केली जाते, आज ज्योतिबाच्या सावित्रीचा विचारांकडे कुठेतरी दुर्लक्षित केले जात आहे. समाजाची ही मानसिकता बदलण्याची आज गरज आहे. असे मत चाकणकर यांनी यावेळी व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या आयोजनासाठी मंडळाचे प्रशांत डोके, सुर्यकांत ताम्हाणे,अनिल साळुंके,विश्वास राऊत,महादेव भुजबळ, निलेश डोके,नितीन ताजणे, वैजनाथ माळी,विलास शेंडे, नरहरी शेवते,किशोर माळी, निखिल यादव,अजित भोसले, केशव ताजणे,शिवम् बर्के,पोपट ताजणे,प्रदीप दर्शले,अमर ताजणे, अनिता ताठे, उर्मिला भुजबळ,आशा माळी,वृषाली ताजणे,कुंदा यादव, स्मिता माळी,शारदा राऊत, पुजा साळुंके ,हर्षद भुजबळ,श्रीहरी हरळे,प्रकाश गोरे,नवनाथ कुदळे,कौशल माळी,परेश ताम्हाणे,रमेश गायकवाड, अशोक टिळेकर यांनी पुढाकार घेतला होता.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अध्यक्ष हनुमंत माळी यांनी केले.
सूत्रसंचालन पौर्णिमा कोल्हे, हभप महादेव भुजबळ यांनी केले. तर आभार विश्वास राऊत यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button