
निगडी (प्रतिनिधी ) माधुरी/ महादेवी हत्तीणीला परत मिळण्यासाठी जैन समाजाकडून अंबानीच्या विरोधात निगडीत निदर्शने करण्यात आली. यावेळी भगवान महावीर अहिंसा ट्रस्टचे अध्यक्ष अजित पाटील आणि महिला मंडळ, वीरसेवा दल निगडी, शांतिसागर पाठशाला आदी संस्थांचे असंख्य श्रावक,श्रविका,विद्यार्थी उपस्थित होते. 
गेल्या आठवड्यामध्ये नांदणी मठ (ता. शिरोळ,जि कोल्हापूर) येथे माधुरी /महादेवी हत्तीणीला मठातून घेऊन गुजरात मधील अंबानीच्या वनतारामध्ये हलविण्यात आले आहे. गेली 35 वर्षे माधुरी मठात वाढलेली आहे. या मठामध्ये गेली 700 वर्ष हत्तीण किंवा हत्ती असल्याची मठाची जुनी परंपरा आहे.परंतु धन दांडग्याच्या हट्टापायी, पेटा सारख्या संस्थेचा गैरवापर करून माधुरी हत्तीनीची देखभाल व्यवस्थित होत नाही,अशी कारणे दाखवणे या हत्तीणीला वनतारा या गुजरातमधील अंबानींच्या खाजगी जंगलात नेण्यात आले आहे. संपूर्ण नांदणी गाव सर्व,जाती,धर्म,पक्ष वरहित बाजूला ठेवून कोल्हापूर, सांगली जिल्हा या अंबानीच्या कृत्या विरुद्ध पेटून उठला आहे. त्यांनी लोकभावनेचा कोणताही विचार केला गेला नाही. प्रत्येक गावाने यासाठीचे निषेध पत्रक/ठराव प्रत्येक गावातून सरकारकडे पाठवले आहेत.
या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड मधील जैन समाज फारच दुःखी झाला आहे, व दुष्कृत्याचा निषेध म्हणून आज सकाळी तसेच पिंपरी चिंचवड शहरातील महिला मंडळाने देखील अंबानीच्या विरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली. माधुरीला त्वरित मठात आणून सोडावे अशी घोषणा देऊन अंबानीच्या विरोधात घोषणाबाजी करत तीव्र निषेत व्यक्त केला.
यावेळी अंबानीच्या उत्पादनावर बहिष्कार टाकून त्यांचे कोणतेही उत्पादन वापरायचे नाही. अशी शपथ घेण्यात आले. शिवाय रिलायन्स जे जीओ सिम कार्ड आहे, ते नागरिकांनी दुसऱया कंपनीकडे पोर्ट करून घेतलेत. तसेच रिलायन्स मार्ट, शॉपिंग मॉल,रिलायन्स फ्रेश,रिलायन्स फायबर अशा उत्पादनांचा त्याग करण्याचा निर्णय घेण्यात आला.
एक मुका प्राणी मठ सोडत असताना त्याच्या डोळ्यातून वाहणारे अश्रू हे पाहून नागरिकच नव्हे तर परिसर आणि निसर्ग देखील हळहळला होता. मठातून ही एक हत्ती नेण्याचं काम म्हणजे साधी गोष्ट नसून ती एक नांदणी मठाच्या परंपरेला तडा देण्याचे काम धनाच्या जोरावर अंबानी करीत असल्याचा आरोप पशु प्रेमींनी केला. आमची लाडकी हत्तीण माधुरीला लवकरात लवकर आमच्या मठाच्या स्वाधीन करावे अशी विनंती आम्ही शासनाकडे देखील करीत आहे याचे गांभीर्याने शासनाने दखल घ्यावी अशी विनंती यावेळी केली.




