दिलीप पांढरकर यांच्या वतीने शैक्षणिक साहित्याचे वाटप
विश्वजित बारणे यांच्या वाढदिवसानिमित्त वाटप

पिंपरी( प्रतिनिधी) शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख दिलीप पांढरकर यांच्या पुढाकाराने मोरवाडी, लाल टोपी नगर येथील ५०० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करून एक मदतीचा हात दिला आले.

यावेळी शिवसेना प. महा. सचिव विश्वजित श्रीरंग बारणे, माजी नगरसेवक रामदास लुक्कर,शिवसेना उपजिल्हाप्रमुख दिलीप पांढरकर, प्रबोधनकार शारदा मुंडे, श्री महालक्ष्मी महिला मंडळ उपाध्यक्ष प्राजक्ता पांढरकर, महालक्ष्मी महिला मंडळ अध्यक्षा अश्विनी बागुल, शिवसेना युवती पिंपरी विधानसभा प्रमुख सुवर्णा तडसर, पुष्पा चव्हाण , उज्वला तोमर , प्रतिभा भालेराव, यादव खिलारे, लाल टोपी नगर महिला मंडळ अध्यक्ष नसिम हमीद सय्यद,महाराष्ट्र राज्य लहुजी सेना महिला आघाडीच्या अध्यक्षा मीना यादव खिलारे आदी मान्यवर उपस्थित होते.मोरवाडी येथील
रेणुका विद्यामंदिर शाळेतील पाचशे विद्यार्थ्यांना वह्या व पेनचे वाटप करण्यात आले. विश्वजित बारणे यांचा विद्यार्थ्यासोबत वाढदिवस साजरा करण्यात आला.
श्री बारणे म्हणाले कि, विद्यार्थ्यांनो प्रत्येक छोटासा प्रयत्न महत्त्वाचा आहे. आज तुम्ही उचललेले छोटे पाऊल तुम्हाला उद्या काहीतरी मोठे विधायक कार्य करण्याची पेरणा देऊन जाईल म्हणून विद्यार्थ्यांनी शालेय जीवनातील प्रत्येक गोष्टीचा जास्त जास्त फायदा घ्या. उज्वल भविष्यासाठी हे लाभदायक आहे. तुमच्यासमोर कोणतीही आव्हाने आली तरी नेहमीच पुढे जाण्याचा प्रयत्न करा. जीवन इतरांसोबत स्पर्धा करण्यासाठी नाही तर स्वतःच्या सर्वोत्तम आयुष्य बनवण्याचा प्रवास आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हर्षवर्धन पांढरकर तर आभार प्राजक्ता पांढरकर यांनी मानले.




