
चिंचवड (प्रतिनिधी) संभाजी नगर येथील कॅम्प एज्यूकेशन सोसायटीचे डॉ. अरविंद बी. तेलंग इन्स्टिटयूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी कॅम्प एज्यू सोसायटीचे अध्यक्ष वालचंद डी. संचेती, कॅनरोड हॉटेलचे महा व्यवस्थापक अभिषेक सहाय, मारिओट हॉटेलचे मनुष्यबळ विकास व्यवस्थापक पौर्णिमा कुमारी ग्रँड एक्सोटीकाचे आम्रपाली देसाई , प्राचार्य (डॉ.) अजयकुमार राय आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन करून राष्ट्रगीताने झाली. प्राचार्य डॉ.अजय कुमार राय यांनी अतिथींचे स्वागत करून त्यांचा सत्कार केला.
यावेळी अभिषेक सहाय म्हणाले कि, विद्यार्थ्यांनी स्वतःसाठी नाही तर जगासाठी तयार व्हा असा मोलाचा सल्ला दिला. चांगले समृद्ध जीवन जगायचे असेल तर चौकटी बाहेर पडून खूप मेहनत करा. या हॉटेल उद्योगामध्ये अनेक मोठं मोठे कलाकार , उद्योजक येत असतात, त्यामुळे त्यांना चांगली सेवा द्यायची आपल्याला एक संधी मिळते. आणि त्यांच्याकडून आपल्याला खूप चांगल्या गोष्टी शिकायला देखील मिळतात. यासाठी विद्यार्थ्यांनी आपले इंग्रजी संभाषण कौशल्य, व्यक्तिमत्व विकास आणि विशेष हॉस्पिटॅलिटी कौशल्य वाढवावे, असा सल्ला दिला.
विद्यार्थ्यांनी हॉटेल इंडस्ट्री मध्ये काम करताना चेहऱ्यावर नेहमी हास्य ठेवले पाहिजे आणि हॉटेल मध्ये येणाऱ्या प्रत्येक अभ्यागतांची मनापासून काळजी घेतली पाहिजे, असे पूर्णिमा कुमारी म्हणाल्या.
सोसायटीचे कार्याध्यक्ष संचेती यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आणि प्रत्येक टप्प्यावर विद्यार्थ्यांना यश मिळावे अशा सदिच्छा व्यक्त केल्या.
प्राचार्य राय यांनी या वर्षीच्या प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभसाठी प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी केलेल्या प्रामाणिक प्रयत्नांचा उल्लेख केला.
या कार्यक्रमाचे सूत्र संचालन द्वितीय वर्षातील विद्यार्थी कु. मृणाल सोनकुसरे आणि विद्यार्थिनी कु. आदिती भालेराव यांनी केले तर प्रा.शेखर खैरनार यांनी आभार प्रदर्शन केले.



