शैक्षणिक

शाहू महाराज विद्यालयमध्ये “एक पेड माँ के नाम”

विधायक उपक्रमाचे शाळेचे कौतुक

पिंपरी (प्रतिनिधी)चिखली शरद नगर येथील बोधिसत्व प्रतिष्ठान शिक्षण संस्था संचालित राजर्षी शाहू महाराज विद्यालयामध्ये संस्थेचे सचिव एल.एस.कांबळे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी माजी विद्यार्थी मारुती जाधव, धनंजय जाधव, विकास मस्के,सुधाकर ओव्हाळ, मुख्याध्यपक बाबाजी शिंदे आणि पालक आदी उपस्थित होते.

यावेळी माजी विद्यार्थी, अनेक विद्यार्थ्यांच्या आई यांच्याही हस्ते विद्यालयामध्ये व विद्यालयाच्या शेजारी असणाऱ्या गार्डनमध्ये वृक्षारोपण करण्यात आले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संतोष घरडे, सुजाता जोगदंड, पूनम तारख, संदीप बोर्गे, कोमल गायकवाड, जितेंद्र सूर्यवंशी, किशोर बडे, योगिता होनमाने, जयश्री महानवर, आनंद गोंदील, प्रमोद रायकर, अमोल सूर्यवंशी, धुडकू कुवर, स्वप्निल पठारे यांनी परिश्रम घेतले..

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button