डी वाय पाटील इंटरनॅशनल विद्यापीठात”दिक्षारंभ” संपन्न
तंत्रज्ञानामुळे नोकऱ्या जाणार नाही- शेटे

आकुर्डी, १४ सप्टेंबर : आकुर्डी स्थित डी. वाय. पाटील इंटरनॅशनल विद्यापीठात ‘दिक्षारंभ २०२५–२६’ हा विद्यार्थी स्वागत सोहळा मोठया उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाला उद्योगजगत व शिक्षण क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. नव्या विद्यार्थ्यांचे स्वागत प्रेरणादायी संदेश, पुस्तक प्रकाशन सोहळा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी रंगतदार झाले.
यावेळी कॅपजेमिनी इंजिनिअरिंगचे कार्यकारी उपाध्यक्ष प्रसाद शेटे, फ्लोकार्डचे मुख्य डिजिटल संचालक सुशील तिवारी, डीवाय पाटील प्रतिष्ठान चे विश्वस्त तेजस पाटील, डी वाय पाटील इंटरनॅशनल विद्यापीठाचे कुलगुरू डॉ मनिष भल्ला, कुलसचिव डॉ बेरान मनोद्दीन, संशोधन व विकास अधिष्ठाता डॉ. शशि सिंह, शैक्षणिक अधिष्ठाता डॉ. माधवी देशपांडे,परीक्षा नियंत्रक डॉ. माधुरा जगताप आदी उपस्थित होते.
यावेळी मुख्य अतिथी श्री शेटे म्हणाले कि , “नवीन तंत्रज्ञानामुळे कुणाचीही नोकरी जाणार नाही. तंत्र ज्ञान आत्मसात करून बदल न स्वीकारल्यास , तर तुमचे करिअर नक्कीच धोक्यात येऊ शकते.”असे मत व्यक्त केले.
फ्लोकार्डचे मुख्य डिजिटल अधिकारी डॉ. सुशील तिवारी यांनी विद्यार्थ्यांना सातत्याने शिकण्याचा सल्ला दिला. ते म्हणाले, “भविष्य त्यांच्याच हाती आहे जे शिकतात, विसरतात आणि पुन्हा शिकतात. लवचिकता हीच खरी ताकद आहे.”
विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. (डॉ.) मनीष भल्ला यांनी विद्यार्थ्यांना उद्देशून सांगितले, “डीवायपीआययू येथे आम्ही नवोपक्रम, आंतरशाखीय शिक्षण आणि सर्वांगीण विकासाचा संगम साधून विद्यार्थ्यांना भविष्याची तयारी करून देत आहोत.”
संस्थेचे विश्वस्त तेजस पाटील म्हणाले कि, “हे विद्यापीठ केवळ शिक्षणाचे केंद्र नाही, तर उद्याचे नेते आणि उद्योजक घडविण्याचे व्यासपीठ आहे.”
कॅम्पस संचालक रिअर अॅडमिरल (नि.) अमित विक्रम यांनी शिस्त आणि मूल्यांवर भर देत सांगितले, “विद्यापीठ हे जीवन संघभावना, नेतृत्व व जबाबदारी आत्मसात करण्याचे प्रशिक्षण क्षेत्र आहे.”
शैक्षणिक नेतृत्वातून संशोधन व विकास अधिष्ठाता डॉ. शशि सिंह यांनी संशोधन आणि नवोपक्रमावरील विचार मांडले, शैक्षणिक अधिष्ठाता डॉ. माधवी देशपांडे यांनी स्वागतपर भाषण केले, तर परीक्षा नियंत्रक डॉ. माधुरा जगताप यांनी विद्यार्थ्यांना प्रामाणिकपणा व जबाबदारीचे महत्त्व अधोरेखित केले.
या कार्यक्रमात विद्यापीठाचे नवे प्रकाशन ‘दि नाऊ अँड द नेक्स्ट : इंटरडिसिप्लिनरी रिफ्लेक्शन्स’ हे पुस्तक प्रकाशित करण्यात आले.
कार्यक्रमाचा समारोप कुलसचिव डॉ. बेरान मोईद्दीन यांच्या आभार प्रदर्शनाने झाला. शेवटी ‘मेहफिल क्लब’च्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमांनी वातावरण रंगून गेले.
फोटो ओळ-
डावीकडून डॉ.बीरन मोईदीन, डॉ.मनीष भल्ला, डॉ. सुशील तिवारी, श्री. तेजस पाटील, प्रसाद शेट्ये, अमित विक्रम (नि), संदीप डोंगरे, डॉ. पल्लवी झा




