शैक्षणिक

विश्वरत्न इंग्लिश स्कुलच्या वास्तूचे उदघाटन

मोरे वस्तीमध्ये नवीन जागेत स्थलांतरित

चिखली (प्रतिनिधी ) राजमाता अहिल्यादेवी शिक्षण संस्था संचलित विश्वरत्न इंग्लिश मीडियम स्कूल व विष्णुपंत ताम्हाणे विद्यालय मोरे वस्ती चिखली या दोन्ही विद्यालयाचा नवीन इमारतीमध्ये प्रशस्त आणि सुंदर प्ले ग्राउंड, सायन्स लॅब, स्वच्छ हवा अशा वातावरणात विद्यालयाची प्रशस्त इमारत या इमारतीचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी श्री शिवाजीराव घोडे, रेखाताई घोडे, श्री मच्छिंद्र मोरे, बाळासाहेब गायकवाड व संस्थेचे अध्यक्ष वेंकटेश वाघमोडे सर मुख्याध्यापिका मराठी माध्यम रंजना आव्हाड मॅडम इंग्लिश मीडियम च्या सई पांचाळ व शिक्षक पुरंदर विद्यार्थी यांच्या समवेत प्रवेश करण्यात आला. श्री शिवाजीराव घोडे व मच्छिंद्र मोरे बाळासाहेब गायकवाड यांच्या हस्ते इमारतीचे फित कापून श्रीफळ फोडून प्रवेश करण्यात आला. श्री शिवाजीराव घोडे यांनी वातावरण स्वच्छ हवा पाहून समाधान व्यक्त केले व विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त केला या विद्यालयातून अनेक विद्यार्थी घडतात व असेच पुढेही घडत राहो अशी अपेक्षा करतो असे उद्गार शिवाजीराव घोडे यांनी व्यक्त केले त्यांना शाल श्रीफळ देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला व मान्यवरांचा हे वाघमोडे सरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. सिनेस्टार कलावंत विद्यार्थिनी म्हणून धनश्री घोडे हे याच विद्यालयातून शिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली आज फिल्मस्टार बनत आहे असेच विद्यार्थी कलावंत, संगीतकार, गायक, व्यवसायाच्या दृष्टिकोनातून डॉक्टर इंजिनीयर व देशाचे संरक्षण करणारे सैनिक पोलीस असे शुद्ध विचार घेऊन विद्यार्थी पुढे वाटचाल करीत आहेत असे स्तुती सुमने शिवाजीराव घोडे यांनी विद्यार्थ्यांना व्यक्त केले. सूत्रसंचालन मुख्याध्यापिका रंजना आव्हाड व मुख्याध्यापिका सई पांचाळ यांनी आभार मानले श्रेय सर्व शिक्षकांनी घेतले फोटोकॉपी व विद्यार्थ्यांना चॉकलेट पुष्प देऊन कार्यक्रम संपला

Related Articles

2 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button