
पिंपरी (प्रतिनिधी) निगडी येथील इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकौंटन्टस ऑफ इंडिया ( आयसीएआय) यांच्या वतीने उद्योजकांसाठी “एक दिन एमएसएमई के नाम” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती अध्यक्ष सीए वैभव मोदी यांनी दिली.
हा कार्यक्रम दि २७ जून २०२५ रोजी ४ वा. सिद्धी विनायक नगरी रोड, जकात नाक्या मागे, ट्रान्सपोर्ट नगर येथील आयसीएआय भवनमध्ये होणार आहे.
यावेळी अॅड जमशेद मिस्त्री, सीए महेश्वर मराठे,सीए संतोष एच. दोशी,इंडो-अमेरिकन चेंबर्स ऑफ कॉमर्सचे उपाध्यक्ष अंनत गोणवंडे,सीए निपुण सिकरी,मुस्तफा हुसेनवाला,तुषार शेट्टी,अनंत निपुणचा, पॉला मॅकग्लिन,आयली घिया,मोनिका राजदान,आकाश सुरेका,विश्वेश जिरगले,रशना जेहानी आदी उपस्थित राहणार आहे. यावेळी उद्योजकांसाठी एमएसएमई मंत्रालयाचे प्रतिनिधी, गुंतवणूक सल्लागार, कलाकार,बँका प्रतिनिधी आदी उद्योग, स्टार्टअप क्षेत्रातील मान्यवर मार्गदर्शन करणार आहे. शहरातील उद्योजकांनी सहभागी होण्याचे आयोजकांनी आवाहन केले आहे. अधिक माहितीसाठी खालील संकेतस्थळाला भेट दयावी.
https://www.pimprichinchwad-icai.org




