सामाजिक

सीएमएसच्या वतीने आकुर्डीत महिलांचा सत्कार

सीएमएस चा पुढाकर

पिंपरी (प्रतिनिधी) चिंचवड मळ्याळी समाजमच्या (सीएमएस) वतीने आकुर्डीतील केरला भवन येथे
महिला दिनानिमित्त विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचे सत्कार करण्यात आला.
यावेळी फ्लेम विद्यापीठाच्या चेअर डॉ.दिव्या बालन, सीएमएसचे अध्यक्ष टीपी विजयन, सरचिटणीस सुधीर सी नायर, खजिनदार व्ही.के रमाकृष्णन, सीएमएस इंग्लिश मिडीयम शाळेच्या मुख्याध्यापिका डॉ. बीजी पिल्ले, सीएमएस महिला विभागप्रमुख प्रविजा विनीत खजिनदार वल्सला नायर, जेस्सी कुरियन आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

डॉ. रेणू मॅथ्यू (शैक्षणिक आणि प्रशासन क्षेत्रातील),
लीना अशोक (महिला उद्योजक),
मिशनरीज ऑफ चॅरिटी मदर थेरेसा होम, चिंचवड (मानव सेवा),स्वप्ना मेनन (औद्योगिक प्रशिक्षक)
यांना विशेष पुरस्काराने गौरविण्यात आले.

यावेळी सीएमएस महिला विभागाकडून मदर तेरेसा होमला ५१ हजाराची देणगी देण्यात आली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रविजा विनीत यांनी केले. सूत्रसंचालन लता मेनन यांनी तर आभार जेस्सी कुरियन यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button