शाहू अभियांत्रिकी विद्यार्थ्यांचा शनिवारी गौरव समारंभ
सुवर्णपदकासह ११८७ विद्यार्थी होणार सन्मानित

पिंपरी (प्रतिनिधी) जे. एस. पी. एम. संस्था संचलित ताथवडे येथील राजर्षी शाहू कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग च्या सन २४-२५ मध्ये बी. टेक, एम. टेक, एम. सी. ए. एम. बी. ए. उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा गौरव कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. हा सोहळा दि २ ऑगस्ट २५ रोजी ग.दि. माडगुळकर सभागृह, आकुर्डी येथे दुपारी ३.४५ वाजता आयोजित करण्यात आलेला आहे.
संबंधित सर्व विद्यार्थ्यांनी ग.दि.मा. सभागृहात दुपारी २.३० वाजता उपस्थित राहावे, असे आवाहन राजर्षी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे संचालक डॉ. एस. पी. भोसले यांनी केले आहे. हा कार्यक्रम संस्थेचे संस्थापक सचिव डॉ. टी. जे. सावंत यांच्या अध्यक्षतेखाली व आय. आय. टी. रोपारचे संचालक डॉ. राजीव अहुजा यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.
या कार्यक्रमास पुणे, नाशिक आणि गोव्याचे टी. सी. एस येथील विभाग प्रमुख प्रसाद शास्त्री, यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
या कार्यक्रमामध्ये साधारण ११८७ विध्यार्थ्यांना मानांकन आणि प्रशंसा पत्र देण्यात येणार आहे. परीक्षेमध्ये प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यास बक्षीस म्हणून १ लाख रुपये रोख आणि सुवर्ण पदक, आणि सर्वोत्तम विद्यार्थ्यास देखील बक्षीस म्हणून १ लाख रुपये रोख आणि सुवर्ण पदक देण्यात येणार आहे; अशी माहिती विद्यार्थी विकास संचालक डॉ. राजकुंवर डुबल आणि विद्यार्थी परीक्षा संचालक डॉ बी डी जाधव यांनी दिली आहे.




