स्व. ज्ञानेश्वर देवकुळे फाउंडेशनच्या वतीने चारशे जणांची तपासणी
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवशी उपक्रम


निगडी (प्रतिनिधी) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त मामूर्डी रावेत प्रभाग १६ मध्ये स्व. ज्ञानेश्वर देवकुळे सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ हेमंत अरुण देवकुळे यांच्या वतीने निगडी येथे आयोजित करण्यात आलेल्या आरोग्य तपासणी शिबिरात पाचशे नागरिकांनी लाभ घेतला.
या शिबिराचे उद्घाटन डॉ प्रवीण बढे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी भाजपाचे अमोल थोरात, सामाजिक कार्यकर्ते सलीम शिकलगार, माजी महापौर आर एस कुमार व चंद्रशेखर पवार उपस्थित होते.
डॉ हेमंत देवकुळे त्यांच्या पुढाकाराने घेतलेल्या शिबिरात राज्यपाल पुरस्कृत डॉ प्रवीण बडे यांनी अत्याधुनिक जर्मन तंत्रज्ञानाच्या साहाय्याने पाचशे नागरिकांची संपूर्ण शरीराची तपासणी केली. तसेच हाडांची ठीसुळता मशीनच्या साह्याने चारशे नागरिकांची तपासणी करण्यात आली.
तसेच मेट्रोपोलीस पॅथलॅब च्या सहकार्याने शरीरातील रक्ताचे प्रमाण, रक्तदाब तपासणी व शरीरातील साखरेचे प्रमाण इत्यादी तपासण्याचा तीनशे नागरिकांनी लाभ घेतला. तसेच श्रीराम नेत्रालय त्यांच्या वैद्यकीय पथकाने जवळपास दोनशे नागरिकांची नेत्र चिकित्सा तपासणी केली.
हे शिबिर यशस्वी करण्यासाठी विठ्ठल चोपडे , राहुल बल्लाळ, तुषार देवकुळे व सुरजेश दुबे यांनी विशेष परिश्रम घेतले.





Interesting take on maximizing enjoyment! Mobile convenience is key, and platforms like pinoy time casino really cater to that. Quick access via APK download is a huge plus for on-the-go players, streamlining the experience.