शैक्षणिक

शाहू कॉलेजच्या वतीने माजी विद्यार्थी मेळाव्याचे आयोजन

डॉ तानाजी सावंत राहणार उपस्थित

पुणे (प्रतिनिधी) जेएसपीएम संचलित ताथवडे येथील राजर्षी शाहू अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यासाठी “मिलाप २०२५”या माजी विद्यार्थी मेळाव्याचे आयोजन दि २६/७/२५ रोजी सं ५वा. “मिलाप -२५” “हॉटेल स्काय ब्लू ,रावेत रोड येथे केले आहे.यावेळी जेएस पीएम संस्थेचे सचिव डॉ तानाजी सावंत, जेएसपीएम विद्यापीठाचे अध्यक्ष डॉ रवी जोशी, संचालक अनिल भोसले आदी उपस्थित राहणार आहेत,
तसेच संचालक कॅप जेमिनीचे शरद खन्ना, टीसीएसचे ग्लोबल हेड प्रमोद भामरे हे प्रमुख पाहुणे मार्गदर्शन करणार आहे. अशी माहिती राजर्षी शाहू अभियांत्रिकी महाविद्यालयाचे संचालक डॉ संतोष भोसले यांनी दिली. महाविद्यालयास २५ वर्ष पूर्ण होत असल्याने हे वर्ष माजी विद्यार्थ्यांबरोबर साजरे करण्याचा मानस आहे. असे ते म्हणाले.या कार्यक्रमाला सर्व माजी विद्यार्थ्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button