औद्योगिक

चाकण एमआयडीसी उद्योजक संघटनेच्या वतीने वृक्षारोपण, रक्तदान

अध्यक्ष जयदेव अक्कलकोटे यांचा पुढाकार

पिंपरी (प्रतिनिधी ) चाकण एमआयडीसी उद्योजक संघटनेच्या वर्धापन दिना निमित्त भंडारा डोंगर परिसरात १५१ झाडांचे रोपण करण्यात आले. तर २५४ जणांनी रक्तदान केले.
यावेळी दिवशी चाकण एमआयडीसी उद्योजक संघटनेचे अध्यक्ष जयदेव अक्कलकोटे यांचा सत्कार करण्यात आला.
संघटनेचे सचिव निवास माने यांनी उद्योजक संघटनेच्या कार्य अहवाल सादर केला. संघटनेचे खजिनदार किसन गायकवाड यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यानंतर संघटनेचे संचालक दत्तात्रय दगडे, लक्ष्मण काळे, प्रवीण माळी, अभिजीत राऊत, महिला उद्योजकांमध्ये सुनिता गायकवाड, प्रियंका गोरे, शिल्पा पवार आदींनी संघटनेमुळे फायदे होत असल्याचे सांगितले.

या कार्यक्रमास महाराष्ट्राचे झुंजार कामगार नेते यशवंत भोसले हे अध्यक्षस्थानी होते. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सचिव बाळासाहेब बोरकर, निघोजे गावचे सरपंच सुनीता येळवंडे, माजी उपसरपंच संतोष येळवंडे, माजी वन अधिकारी रावसाहेब काळे, वस्ताद ताराभाऊ कलापुरे, अहिल्यानगरचे उद्योगपती गुलाब म्हस्के, उद्योगपती अनिल भांगडिया, प्रमोद चौधरी, नामदेव पोटे आदीं उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button