क्रिडा

मैदानी खेळामुळे सर्वांगीण विकास होतो- बांगर

स्पर्धेचा निकाल जाहीर

सीएमएस शाळेत बॅडमिंटन स्पर्धा संपन्न

पिंपरी (प्रतिनिधी ) निगडी येथील सीएमएस हायर सेकंडरी स्कुलच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या अंतरशालेय बॅडमिंटन स्पर्धेचे उदघाटन प्रशाकीय अधिकारी संगीता बांगर यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी सहा. पो. आयुक्त (निवृत्त) बॅडमिंटन खेळाडू मनोहर जोशी, सीएमएस चे अध्यक्ष टी.पी विजयन, सरचिटणीस सुधीर नायर,खजिनदार पी. अजय कुमार, कलावेदी प्रमुख पी.व्ही भास्कर, व्हीके रामकृष्णन, जी.एस नायर, मुख्याध्यापिका बीजी गोपकुमार, चैताली लोंढे आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बांगर म्हणाल्या कि, आपल्या आयुष्यात जगत असताना आपल्याला शारीरिक, सामाजिक, भावनिक, आणि शैक्षणिक सुधारणा होत असतात.
खेळामुळे सर्वांगीण विकास होत जातो.
खेळाडूला स्पर्धेमध्ये समोरच्या विरोधकाची पुढची चाल आधीच लक्षात घेऊन त्यावरती आपलं कौशल्य दाखवून खेळायचं असतं.
स्पर्धेमध्ये खेळाची भावना असावी म्हणजे जेव्हा खेळ चालू व्हायच्या आधी आपण विरोधकाचा हस्त आंदोलन करतो तसेच खेळ संपल्यानंतर पराभव झाल्यानंतर सुद्धा जिंकलेल्याचं अभिनंदन करतो यामध्ये खेळाची भावना जोपासली जाते.
या स्पर्धेत ३६ शाळांतील १५६ खेळाडू सहभागी झाले होते. स्पर्धेसाठी क्रिडा शिक्षक सोनाली पवार, सुजाता गायकवाड, हरिहरण श्रीधरण यांनी विशेष परिश्रम घेतले.

फोटो-
डावीकडून मनोहर जोशी, सुधीर नायर, पी.व्ही भास्कर, उदघाटन करताना संगीता बांगर, टी.पी विजयन, बीजी गोपकुमार आदी
[21/07, 5:21 pm] Sonali Pawar CMS: 🏸 *13 वर्षाखालील मुले* 🏸
*प्रथम क्रमांक*
कृष्णा सावंत -पी आय सी टी स्कूल
*द्वितीय क्रमांक*
स्वराज पवार -विबग्योर स्कूल चिंचवड

🏸 *13 वर्षाखालील मुली* 🏸
*प्रथम क्रमांक*
शिविका बिष्ट -डी वाय पाटील स्कूल
*द्वितीय क्रमांक*
वीराक्षी मुळीक- एस पी एम स्कूल

🏸 *16 वर्षाखालील मुले* 🏸
*प्रथम क्रमांक*
वत्सल तिवारी -कमलनयन बजाज स्कूल
*द्वितीय क्रमांक*
ध्रुव पुरोहित- इंदिरा इंटरनॅशनल स्कूल वाकड

🏸 *16 वर्षाखालील मुली* 🏸
*प्रथम क्रमांक*
नव्या खताळ -स्टर्लिंग स्कूल
*द्वितीय क्रमांक*
दिविना राका- विस्डम वर्ल्ड स्कूल

🏸 *19 वर्षाखालील मुले* 🏸
*प्रथम क्रमांक*
वत्सल तिवारी- कमलनयन बजाज स्कूल
*द्वितीय क्रमांक*
जयेश खेमनार -अल्फोंसा स्कूल

🏸 *19 वर्षाखालील मुली* 🏸
*प्रथम क्रमांक*
दिया सजीश -साधू वासवानी इंटरनॅशनल स्कूल
*द्वितीय क्रमांक*
आरोही जाधव- सेंट उर्सुला स्कूल

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button