
पिंपरी (, प्रतिनिधी) दि १६ नोव्हेंबर २०२५
पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे, आकुर्डीतील प्रा.रामकृष्ण मोरे कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात [स्वायत्त] भगवान बिरसा मुंडा यांची जयंती साजरी करण्यात आली. या प्रसंगी बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अभय खंडागळे यांच्या हस्ते करण्यात आले.
या प्रसंगी आपल्या मार्गदर्शनामध्ये सांगितले की बिरसा मुंडा हे एक भारतीय आदिवासी स्वतंत्र सेनानी होते त्यांचा जन्म 15 नोव्हेंबर १८७५ मध्ये झारखंडमधील उलहातू या गांवी झाला होता. त्यांनी उलगुलान म्हणजेच महान उठाव चळवळ सुरु केली होती.आदिवासिंच्या हक्कासाठी बिरसा मुंडानी इंग्रजाविरुद्ध उठाव केला होता. त्यामुळे त्यांना धरती आबा म्हणून ओळखले जाऊ लागले. बिरसा मुंडा यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी आणि आजच्या पिढीला त्यांची खरी ओळख व्हावी म्हणून बिरसा मुंडा यांची जयंती साजरी करण्यात येत आहे. त्यांच्या या कार्यामुळे 15 नोव्हेंबर हा दिवस संपूर्ण भारतामध्ये ‘जनजातीय गौरव दिवस’ म्हणून साजरा केला जातो .लोक आदराने त्यांना धरती आबा म्हणजे पृथ्वीचे पिता म्हणून संबोधले जाते. बिरसा मुंडा यांनी एक नवीन आदिवासी धर्म स्थापन केला आणि समाजातील अंधश्रद्धा व कुप्रथाविरुद्ध आवाज उठवला.असे प्राचार्य खंडागळे यांनी नमूद केले. या कार्यक्रमा प्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.मधुकर राठोड, ग्रंथपाल अंकुश जाधव, प्रबंधक श्री.संजय झेंडे व शिक्षकेत्तर कर्मचारी देखिल उपस्थित होते .



