
पिंपरी (प्रतिनिधी) ताथवडे येथील पोदार इंटरनॅशनल स्कूलच्या वतीने पोदार प्रेप स्कूलमध्ये ‘मड डे’ बालक- पालक यांच्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या “मड डे” निमित्ताने पालकांनी आपल्या चिमुकल्या सह चिखलात विविध खेळ खेळण्यात रंगून गेले.
या उपक्रमात सुमारे २०० नर्सरी, ज्युनियर आणि सीनियर केजी वर्गातील विद्यार्थी व ३५० पालकांनी उत्स्फूर्त सहभागी झाले होते.विद्यार्थ्यांमध्ये आणि पालकांमध्ये निसर्गप्रेम, स्पर्शज्ञान व सर्जनशीलता वाढवण्यासाठी या उपक्रमात ‘मड्डी बड्डीज योगा’, ‘मड पेंटिंग’, ‘मड बेकरी’, ‘मड्डी फीट योगा’, ‘मुद्रा विथ मड्डी हँड्स’, ‘मड प्ले’ अशा विविध रंजक आणि चिखलाशी संबंधित सर्जनशील खेळांचे आयोजनाचा हेतू होता. यासोबतच मुलांसाठी खास फोटो बूथ देखील सजवण्यात आले होते.
नैसर्गिक स्पर्श, सृजनशीलता आणि निसर्गप्रेम यांचा संगम असलेल्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या भावनिक व शारीरिक विकासाला चालना मिळाली. चिखलाशी खेळताना त्यांनी ‘योगा इन मड (yoga in mud) ’ या संकल्पनेचा अनुभव घेतला, ज्यामुळे शरीर-मनाचे संतुलन साधण्यास मदत झाली.
या उपक्रमात विद्यार्थ्यांनी चिखलात खेळण्याचा आनंद लुटला. विविध खेळ, सर्जनशील क्रिया आणि नैसर्गिक रंगांचा वापर करत विद्यार्थ्यांनी स्वतःचे अनुभव समृद्ध केले.
चिखल हे केवळ माती नसून, त्यातून आरोग्यदायी, मानसिक तणावमुक्ती आणि नैसर्गिक आनंद मिळतो हे शिक्षकांनी उदाहरणातून समजावले.
शाळेच्या शिक्षकांनी मुलांना व पालकांना मार्गदर्शन करत सांगितले, “प्रत्येक विद्यार्थ्याला शालेय शिक्षणाबरोबरच नैसर्गिक जीवनाशी नातं जोडणं हे आमचं उद्दिष्ट आहे.”
“या उपक्रमाची संकल्पना अर्ली चाईल्डहूड असोसिएशनच्या अध्यक्षा आणि पोदार प्रेप च्या संस्थापक व संचालिका डॉ. स्वाती पोपट वत्स यांची होती.”
हा उपक्रम यशस्वीपणे पार पडण्यामागे शाळेचे प्राचार्य अॅग्नेल कार्व्हालो आणि पोदार प्रेपच्या मुख्याध्यापिका अपर्णा भट यांचे मोलाचे योगदान लाभले. या कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून सौ. मयुरी सकलेचा यांनी योग्य नियोजन आणि मार्गदर्शन केले.
पालक रुपाली सोमवंशी म्हणाल्या, “हा उपक्रम फारच सुंदर होता. आमच्या शाळेतील बालपणीच्या आठवणी जाग्या झाल्या.” तसेच आकाश लोढिया म्हणाले, “अशा अनुभवासाठी सहसा पर्यटनस्थळी जावे लागते. पण पोदार शाळेने तोच आनंद आम्हाला येथे दिला. त्याबद्दल आम्ही शाळेचे “शतशः आभारी” आहोत.
हा ‘मड डे’ केवळ एक खेळ नव्हता, तर विद्यार्थ्यांसाठी तो एक अनुभव, एक आठवण आणि निसर्गाशी जोडणारा एक सुंदर सेतू ठरला.




