
निगडी (प्रतिनिधी ) सिद्धीविनायक नगरी ते परमार कॉम्प्लेक्स ( दे.कॅ.बोर्ड वॉर्ड क्र.5 ) आणि परिसरातील इतर भागातील नागरिकांसाठी दि.16/5/2025 रोजी निगडी येथील श्री खंडोबा मंदिरात उत्पन्नाचे दाखले, रहिवासी दाखले,संजय गांधी निराधार योजना पेन्शन रिपोर्ट,
शिधापत्रिका संबंधित कामे तसेच आधार कार्ड संबंधित कामे करून देण्यात आली.
*शासन आपल्या दारी हा कार्यक्रम सुरू असताना मी स्वतः ( तानाजी काळभोर), आमदार सुनिल (आण्णा) शेळके यांना फोन केला.व यावेळी अप्पर तहसीलदार पिंपरी-चिंचवड जयराज देशमुख यांच्याशी आमदार सुनील शेळके यांनी कार्यक्रमाविषयक चर्चा केली.
शासन आपल्या दारी हा कार्यक्रम जयराज देशमुख अप्पर तहसीलदार पिंपरी -चिंचवड,मनिषा माने नायब तहसीलदार पिंपरी-चिंचवड व वैभव भुतेकर मंडल अधिकारी निगडी यांच्या प्रमुख उपस्थित पार पडला.यावेळी शुभदा शेलार ,सोनल बाबळे ,रवि मोहरूत, अशोक अमोदे इ. ग्राम महसुल अधिकारी तसेच प्रशांत पुजारी व तानाजी बोलाडे इ. उपस्थित होते.
यावेळी बालेवाडी येथील खंडेराया प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष गणपत बालवडकर,
रामभाऊ दरवडे, देवस्थानचे खजिनदार जंगलीमहाराज काळभोर,विश्वस्त राजेंद्र लक्ष्मण काळभोर,राजेंद्र अमृता काळभोर तसेच मावळ ता.रा.काॅ.पक्षाचे उपाध्यक्ष बाळासाहेब जाधव,भाजप नेते दिलीप राऊत व बाबासाहेब लुगडे यांनी सदिच्छा भेट दिली.
या कार्यक्रमाचे नियोजन तानाजी काळभोर तसेच
इंद्रसिंग राजपूत,सुधीरराव ढगे,
बाळासाहेब आवंढे,योगेश काळभोर व
हनुमंत रेवी इ यांनी.केले होते.
यावेळी कार्यक्रमाचे प्रस्ताविक वैभव भुतेकर यांनी केले.व सर्वाचे आभार तानाजी काळभोर यांनी मानले*




