रस्ते सुरक्षा रॅलीचे रोटरी क्लबच्या वतीने कासारवाडीत स्वागत
रोटरी क्लब ऑफ एलीटचे अध्यक्ष आवटे यांचा पुढाकार

पिंपरी, १४ सप्टेंबर २०२५: रोटरी क्लब ऑफ “चिक्कमंगळुरूच्या वतीने चिक्कमंगळरू ते
पुणे या दरम्यान काढलेल्या रस्ता सुरक्षा आणि पर्यावरण मोहीम रॅलीचे पिंपरी चिंचवड मधील रोटरी सदस्यांनी कासारवाडी येथे भव्य स्वागत केले.
स्वागत कार्यक्रम हा रोटरी क्लब ऑफ पिंपरी एलिट, रोटरी क्लब ऑफ पिंपरी आणि रोटरी क्लब ऑफ भोसरी डायनॅमिक यांनी संयुक्तपणे आयोजित केला होता. यावेळी प्रमुख पाहुणे प्रांतपाल संतोष मराठे,नियोजित प्रांतपाल नितीन ढमाले,समन्वय रोटरी क्लब ऑफ एलीटचे अध्यक्ष इरफान आवटे आणि सर्व पदाधिकारी , पिंपरी क्लबचे अध्यक्ष आनंद संपत, भोसरी डायनामिक क्लबचे अध्यक्ष डॉ. संतोष मोरे, सुबोध जोशी, रविंद्र भावे यांनी केली होती.
रोटरी क्लब ऑफ पिंपरी- एलिटचे नितीन अर्जुनवाडकर आणि नितीन भावे यांनी यापूर्वी चिक्कमंगळुरूला प्रवास केल्याने , स्वागत शक्य झाले.
चिक्कमंगलुरू येथील रोटरी क्लब ऑफ कॉफीलँड क्लब चे नागेश केंजीगे आणि सचिव आनंद एम, नासिर हुसेन हे ड्राइव्ह चेअरमन आणि पीएचएफ गुरुमूर्ती बी.के हे ड्राइव्ह कोऑर्डिनेटर होते.
फेलोशिपचा विस्तार करण्यासाठी रोटरी क्लब ऑफ बागलकोट (आरआय जिल्हा ३१८२) चे अध्यक्ष मलिकारजुण एस. हदील, सचिव संतोष पाटील, कोषाध्यक्ष ए. प्रकाश भुताल आणि सहाय्यक गव्हर्नर ए. नारायण हरकल यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.हा कार्यक्रम एक परिपूर्ण “ग्रीट अँड मीट” म्हणून काम करत होता,




