डॉ.सोरटे यांचे जमिनी खालील पाण्याचा प्रवाह शोधणे हा शोध ठरतोय समाजोपयुक्त
डॉ.सोरटेंच्या नावावर ३ पेटंट, १०० बोरवेल चे अचूक पॉईंट शोधण्यात यश
पुणे (प्रतिनिधी ) प्रा. रविराज सोरटे यांनी लावलेला शोध समाजाला उपयुक्त ठरत आहे. प्रथमतः त्यांनी जमिनीच्या खालील पाण्याचे प्रवाह शोधण्यासाठी असणारे डाऊझिंग टेक्निक स्वतः आत्मसात केले व त्याचा वापर करून आज ते विविध ठिकाणी जाऊन बोरवेलचे म्हणजेच जमिनीच्या खालच्या पाण्याच्या प्रवाहाचे अत्यंत अचूक व शास्त्रशुद्ध पद्धतीने निदान करीत आहेत. अनेकदा अनेक लोकांचे बोरवेलच्या पॉईंटचे अंदाज चुकल्यामुळे नागरिकांना आर्थिक नुकसान सोसावे लागते, ते नुकसान टाळण्यासाठी प्रा सोरटे यांनी केलेले संशोधन उपयुक्त ठरत आहे.
अत्याधुनिक संसाधनांचा वापर करून त्यांनी आत्तापर्यंत 100 हून अधिक बोरवेलच्या पॉईंटचे निदान केले आहे. प्रा सोरटे व त्यांच्या बरोबर त्यांचे मार्गदर्शक प्रा. डॉ अविनाश खरात व डॉ नंदकुमार धर्माधिकारी यांनी नाव मीटर असे एक उपकरण तयार केले आहे की जे जमिनीच्या खालच्या पाण्याचे प्रवाह अचूक शोधते. यासंदर्भात कोणाला बोरवेल चे अचूक निदान करायचे असेल तर ते डॉ सोरटे यांना संपर्क साधू शकतात.
जिओपॅथिक स्ट्रेस म्हणजेच जमिनीच्या खालच्या पाण्याच्या प्रवाहामुळे तयार होणाऱ्या लहरी अपघातासाठी कारणीभूत होऊ शकतात असे संशोधन डॉ सुनील पिंपळीकर यांनी 2011 मध्ये केले. त्याच संशोधना चा आधार घेऊन डॉ सोरटे यांनी आपल्या संशोधनात असे नवीन तंत्रज्ञान शोधून काढले की ज्यामुळे असे जिओपॅथिक स्ट्रेस झोन्स घालवता येतात. डॉक्टर सोरटे यांनी मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे वरील अपघात कमी करण्यासाठी ‘नावराज अटेन्युएशन सिस्टीम’ नावाचं नवीन संशोधन केले आहे. या संशोधनातून तयार झालेल्या यंत्रामुळे अपघात कमी करून सर्वसामान्य जनतेचा जीव वाचवता येणार आहे. या विषयावरील असलेल्या सखोल अभ्यासामुळे डॉ सोरटे तसेच डॉ खरात व डॉ धर्माधिकारी यांना अमेरिका स्थित सिटी युनिव्हर्सिटी न्यूयॉर्क या विद्यापीठाने निमंत्रित केले होते. भारतातील हे संशोधक व अमेरिकेतील याच विषयावर अभ्यास करणारे संशोधक यांची सखोल चर्चा या माध्यमातून झाली. 2014 मध्ये ही अनोखी अशी चर्चासत्रे न्यूयॉर्क शहरात पार पडली. नुकतेच , कोईम्बतूर, तमिळनाडू येथे झालेल्या यूइर (Uyir) रोड सेफ्टी हॅकेथॉन अंतिम स्पर्धेत प्रा डॉ रविराज सोरटे प्रा डॉ. अविनाश खरात व प्रा. डॉ नंदकुमार धर्माधिकारी यांच्या संशोधन अंतिम स्पर्धेपर्यंत पोहोचले , व या स्पर्धेमध्ये या संशोधनाचा विशेष सन्मान करण्यात आला. श्रीकृष्ण कॉलेज ऑफ इंजिनियरिंग अँड टेक्नॉलॉजी युइर (Uyir) या एनजीओच्या माध्यमातून कोईमतुर शहरांमध्ये आयोजित केलेल्या रोड सेफ्टी हॅकॅथॉनचे स्पर्धेमध्ये एकूण 3000 पेक्षा अधिक संशोधन प्रकल्प सहभागी झाले होते. यात 12 राज्यांमधून 145 टीम्स सहभागी झाल्या होत्या. पुण्यामधून गेलेल्या या तिघांच्या टीमने 2 प्रस्ताव सबमिट केले होते. सबमिट केलेल्या एकूण 3000 पेक्षा अधिक सबमिशन मध्ये शेवटच्या ग्रँड फिनालेला विद्यार्थी व प्रोफेशनल या दोन कॅटेगरीमध्ये एकूण 145 प्रोजेक्ट सिलेक्ट करण्यात आले होते. ज्यात प्रोफेशनल कॅटेगिरी मध्ये 21 प्रोजेक्ट फायनल मध्ये होते. त्यापैकी सोसायटी फोर ऍडव्हान्समेंट ऑफ डाऊझिंग यांच्याकडून या तिघांचे 2 प्रस्ताव अंतिम फिनाले साठी निवडले गेले . जमिनीच्या खालून जाणाऱ्या पाण्याच्या प्रवाहामुळे तयार होणाऱ्या लहरींमुळे होणारे अपघात व त्यावरील उपाय योजना हे दोन विषय या तिघांनीही अत्यंत तांत्रिक पद्धतीने परीक्षकांसमोर मांडले. यास्पर्धेच्या दरम्यान कोईम्बतूरचे आयुक्त, पोलीस आयुक्त, कोईम्बतूर मनपा आयुक्त तसेच अनेक अधिकारी उपस्थित होते.
अतिवृष्टीच्या काळात पाण्याची पातळी वाढल्यामुळे शहरात अनेकदा पूरजन्य परिस्थिती निर्माण होते. अशावेळी वेगाने पाण्याचा निचरा करण्यासाठी अनेकदा मॅन होल कव्हर म्हणजेच ड्रेनेजचे झाकण काढून ठेवण्यात येते. त्यामुळे अनेकदा वाहतुकीला अडथळा निर्माण होतो व अपघात होतात, नुकत्याच समोर आलेल्या आकडेवारीनुसार अशा पद्धतीच्या अपघातामुळे अनेक नागरिकांना आपले प्राण गमावले लागले आहेत. अश्या परिस्थितीत सुरक्षित रित्या पाण्याचा निचरा करण्यासाठी ड्रेनेजच्या झाकणांना नवीन पर्याय म्हणून डॉ. सोरटे यांनी ‘इंडियन सॉल्ट शेकर मॅन होल कवर’ शोधून काढले आहे. या संशोधनात डॉ सोरटे व त्यांचे विद्यार्थी सोहम बोराटे व विनायक गुंड यांनी देखील योगदान दिले. या पार्श्वभूमीवर काम करीत असताना हे तंत्रज्ञान व त्याच्या वापरामुळे जीवित हानी टाळणे शक्य आहे. शासनाने या शोधांची अंमलबजावणी केल्यास, पावसाळ्यात नागरिक ड्रेनेजमध्ये पडून वाहून जाण्यासारखे अपघात टाळता येतील. पर्यायाने या शोधामुळे जीवितही टाळता येणार आहे.
प्रा. डॉ सोरटे हे अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेच्या अनंतराव पवार कॉलेज ऑफ इंजिनियरिंग अँड रिसर्च च्या स्थापत्य अभियांत्रिकी विभागप्रमुख असून 2017 मध्ये त्यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची पीएचडी डिग्री प्राप्त केली. आपल्या संशोधनाबद्दल सांगताना डॉ सोरटे म्हणाले की, “मला लाभलेल्या अनेक चांगल्या मार्गदर्शकांमुळे अशा पद्धतीचे समाज उपयोगी संशोधन करण्यात मला यश प्राप्त झाले.व भारत सरकारनेही या संशोधनाला पेटंट म्हणून मान्यता दिली. यामुळे मी त्यांचा आभारी आहे त्याचप्रमाणे आज माझी तीन पेटंट्स समाजासाठी उपयोगी होत आहेत. यात मला फार आनंद आहे”. या सर्व संशोधनांची शासनाने दखल घेऊन अनेक समाज उपयोगी उपक्रम राबवता येतील व प्रामुख्याने समाजात असलेल्या प्रश्नांना आपल्या संशोधनाने उत्तर देता येतील, असे डॉ सोरटे यांना वाटते. यासंदर्भात संशोधनाची माहिती देण्यासाठी व त्याची अंमलबजावणी करण्यासाठी डॉ सोरटे हे शासनाच्या अनेक विभागांना या माध्यमातून संपर्क साधत आहेत.
प्रा डॉ रविराज रमेश सोरटे
(बीई सिविल इंजीनियरिंग, एलएलबी ,एम टेक जिओ टेक्निकल इंजीनियरिंग, पीएचडी सिव्हिल इंजिनिअरिंग) ,




