कार्ला बौद्ध लेणी येथे बुद्ध पौर्णिमेनिमित्त हजारोंच्या उपस्थितीत “महाबुद्धवंदना” संपन्न*

मावळ (प्रतिनिधी) सालाबादप्रमाणे सोमवार दिनांक १२ मे २०२५ रोजी २५६९ व्या बुद्ध पौर्णिमेनिमित्त कार्ला बौद्ध लेणी, मावळ, पुणे येथे भिक्खू संघाच्या उपस्थितीत महाबुद्धवंदनेचे आयोजन करण्यात आले होते.
सदर कार्यक्रमात आदरणीय भंते धम्मानंद यांच्यासह ३० श्रामणेर, हजारो उपासक – उपासिका व स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते.
याप्रसंगी सकाळी १० वाजता “महाबुद्धवंदना” व सुत्तपठण घेण्यात आले त्यानंतर आदरणीय भंते धम्मानंद यांनी उपस्थित उपासकांना धम्मदेसना देत भगवान गौतम बुद्ध यांच्या विश्वशांतीचा मार्ग सांगितला. तसेच अहिंसा, मैत्री-भाव, पंचशील, अष्टांग मार्ग यांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन केले. त्यानंतर महाराष्ट्रातील सर्व लेणी संवर्धन संघटना यांच्यातर्फे भिक्खू संघास व उपासकांना भोजनदान करण्यात आले.
कार्ला बौद्ध लेणी लोणावळ्याजवळ वेहेरगाव येथे बौद्ध भिक्खुसाठी इ.स. पूर्व पहिल्या शतकात कोरण्यात आली. कार्ला लेणीमध्ये जम्बुव्दिपातील सर्वात मोठे चैत्यगृह व स्तूप कोरण्यात आलेला आहे. कार्ला लेणी थेरवाद व महायान या दोन्हीही प्रमुख बौद्ध शाखेच्या एकीचे प्रतीक मानले जाते. या लेणीतील भगवान बुद्ध, बोधिसत्व, हत्ती, पिंपळाकृती कमानी, बौद्ध राजे-राण्या, मोठे स्तंभ अशी सुबक व कोरीव शिल्पे प्राचीन भारतीय कलेची साक्ष देतात.





Logging in is fast and the account management is very straightforward. I appreciate how they keep the security tight while making access easy. Love using kapten69login.