डॉक्टरांनी आपली जमेची बाजू समाजात मांडावी- डॉ. संतोष कदम
आयएमए पिं-चिं-भोसरी शाखाध्यक्षपदी डॉ धोका

पिंपरी (प्रतिनिधी) इंडियन मेडिकल असोसिएशन पिंपरी चिंचवड भोसरी शाखेच्या अध्यक्ष म्हणून बाल रोगतज्ञ डॉ. ललितकुमार धोका यांची निवड करण्यात आली. सचिवपदी डॉ.मिलिंद सोनावणे तर खजिनदार पदी डॉ. प्रकाश रोकडे यांची नियुक्ती करण्यात आली. या व्यतिरिक्त इतर ४५ पदाधिकाऱ्यांचा रावेत येथे पदग्रहण समारंभ दि ११ मे रोजी संपन्न झाला.
यावेळी इंडियन मेडिकल असोसिएशन, महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष डॉ. संतोष कदम व सचिव डॉ.अनिल आव्हाड व उपाध्यक्ष डॉ.राजू वरयानी डॉ दिलीप कामत आदी मान्यवर उपस्थित होते.
डॉ. ललितकुमार धोका यांच्या अध्यक्षीय भाषणात त्यांनी मावळत्या अध्यक्षा डॉ. माया भालेराव व मावळत्या सचिव डॉ. सारिका लोणकर यांच्या कार्याचा गौरव करून विशेष सत्कार केला .
शाखेचे मार्गदर्शक डॉ. दिलीप कामत व इतर ट्रस्टींचे मोलाचे योगदान त्यांनी नमूद केले.
या वर्षी “सीएमई, डॉक्टर कल्याण, आणि आरोग्य जनजागृती” या तीन मुख्य क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करण्यात येणार असल्याचे डॉ धोका यांनी यावेळी सांगितले .
याचबरोबर डॉक्टरांसाठी औ “जिंदादिली इव्हेंट्स पॅकेज स्कीम” ही नवी संकल्पना राबविण्यात येत आहे, ज्यामुळे डॉक्टरांना कमी खर्चात जास्त उपक्रम उपलब्ध होतील. त्यांनी सर्व डॉक्टर बांधवांना या योजनेत सहभागी होण्याचे व इतर नॉन मेंबर्स डॉक्टरांनाही जोडण्याचे आवाहन केले.
डॉ. ललितकुमार धोका यांनी सेवा, एकता आणि प्रगती या ब्रीदवाक्याने पुढील वर्षात कार्य करण्याचा संकल्प व्यक्त केला.
कार्यकारिणी पुढील प्रमाणे
डॉ ललितकुमार धोका ( अध्यक्ष),डॉ मिलिंद सोनावणे (सचिव), डॉ प्रकाश रोकडे (खजिनदार)
डॉ. रितू लोखंडे ( सहसचिव),डॉ रुपाली एकबोटे
(सहकोषाध्यक्ष) डॉ सुधीर भालेराव ( नियोजित अध्यक्ष), डॉ अनिरुद्ध टोणगावकर (वरिष्ठ उपाध्यक्ष), डॉ मंदार डोईफोडे (उपाध्यक्ष)
महिला डॉक्टर्स विभाग पदाधिकारी
डॉ.सारिका लोणकर (अध्यक्ष), डॉ वर्षा डांगे (उपाध्यक्ष),डॉ. अमृता इंगळे (सचिव), डॉ निहार इंगळे( संपादक,स्पंदन मासिक)
आय एम ए महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष डॉ संतोष कदम यावेळी म्हणाले की, डॉक्टरांवरील व हॉस्पिटल वरील हल्ला प्रकरणी *वैद्यकीय हल्ला कायाद्याची अंमलबजवणी होत नाही.
केंद्र सरकारचा हा कायदा ३० राज्यात लागू झालेला आहे. मात्र महाराष्ट्रात अंमलबजावणीसाठी अनास्था पाहायला मिळते .
या कायद्यानुसार हल्लेखोराला अटक होते व जामीनही होत नाही.
दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल प्रकरणात मीडियातून नकरात्मक बाजू दाखवली गेली. यामुळे हॉस्पिटलची व डॉक्टरांची प्रतिमा मलीन केली गेली. अशा वेळेस महाराष्ट्र राज्य इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वतीने सडेतोड बाजू मांडली गेली व डॉ. घैसास यांना भक्कम पाठींबा दिला.
या प्रकारांमध्ये डॉक्टरांनी आपली विधायक बाजू स्वतःहून समाजापुढे आणली पाहिजे.
इंडियन मेडिकल असोसिएशनच्या राज्यभरातील विविध शाखांमधून या कायद्यांची अंमलबजावणीसाठी सरकारवर दबाव आणला पाहिजे व डॉक्टरांच्या रास्त मागण्या या सरकारने वेळीच लक्ष देऊन सोडविल्याही पाहिजेत ही सरकारकडे मागणी ही केली.



