सामाजिक

पंजाबी वेलफेअर फाउंडेशनच्या वतीने रविवारी “मिलाप” विवाह परिचय मेळावा

दि ११ रोजी आकुर्डीत होणार मेळावा

पिंपरी, (प्रतिनिधी): पंजाबी समाजातील विवाह इच्छुकां साठी पंजाबी वेलफेअर फाउंडेशनच्या (पीसीएमसी) वतीने “मिलाप” विवाह परिचय मेळाव्याचे आयोजन दिनांक ११ मे २०२५, रविवार रोजी करण्यात आले आहे. हा कार्यक्रम सकाळी १०:३० ते २:३० या दरम्यान होणार आहे.
हा मेळावा गुरुद्वारा ओल्ड एज होम, आकुर्डी गुरुद्वाराच्या मागे, आकुर्डी रेल्वे स्थानकाजवळ,या ठिकाणी होणार आहे.
हा मेळावा विवाह इच्छुक मुला-मुलींसाठी एक व्यासपीठ आहे, जिथे ते आपल्या भावी जोडीदाराची ओळख करू शकतात. प्रत्येक उमेदवाराने आपल्या पालक किंवा कुटुंबासह उपस्थित राहणे बंधनकारक आहे.

हा कार्यक्रम पूर्णतः विनामूल्य असून, नोंदणीची अंतिम तारीख 10 मे २०२५ आहे.
🔗 नोंदणीसाठी गूगल फॉर्म लिंक:
https://forms.gle/B9u9WWfdAnpFhWuq9
(फक्त नवीन उमेदवारांसाठी)

*संपूर्ण देशभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद!*
पुणे किंवा महाराष्ट्रापुरता मर्यादित न राहता, संपूर्ण भारतातून अनेक पंजाबी कुटुंबे या कार्यक्रमासाठी नोंदणी करत आहेत. समाजात आपुलकी, जिव्हाळा आणि संस्कृती टिकवून ठेवण्यासाठी हे व्यासपीठ फारच उपयुक्त ठरत आहे.
अशी माहिती फाउंडेशनचे अध्यक्ष सुरेंद्र वधवा आणि सचिव हरेश मन्धान यांनी दिली.
अधिक माहितीसाठी संपर्क साधा:
लीना सप्रा – 📞 9860607127,
गीता वोहरा – 📞 9146810007,
योगिता भाटिया – 📞 9145456724,
किशोर कन्ट्रोड – 📞 8999812408

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button