
चिखली (प्रतिनिधी) ‘नुर ए इमान सोशल तहेरीक (नीस्ट)च्या वतीने कार्तिकी एकादशीनिमित्त वारकऱ्यांना फराळ वाटप करण्यात आले.’ या सामाजिक संस्थेतर्फे चिखलीमध्ये राबवला जातो. गेली 18 वर्षापासून अखंडित पणे हा उपक्रम राबविला जात आहे.
याही वर्षी हा उपक्रम सामाजिक सलोखा जपत राबवला गेला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष फिरोज शेख, मुस्ताक मोमीन, इसाक भाई शेख, हबीब भाई शिकलगार, दस्तगीर भाई शिकलगार, डॉक मोहसीन मोमीन आणि इतर कार्यकर्ते उपस्थित होते.



