शैक्षणिक

शाहू बीएड कॉलेजमध्ये महिला सबलीकरणा वर कार्यशाळा

महिलांच्या प्रश्नावर मान्यवरांनी टाकला प्रकाश

पिंपरी(प्रतिनिधी) जेएसपीएम संचलित ताथवडे येथील राजर्षी शाहू कॉलेज ऑफ एज्युकेशन ( बीएड ) महाविद्यालय आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संयुक्त विद्यमाने “महिला सबलीकरण व सक्षमीकरण” या विषयावर कार्यशाळा नुकतीच पार पडली. या कार्यशाळेत स्त्री रोगतज्ञ डॉ. मिता ससे यांनी महिलांच्या विविध आरोग्यविषयक समस्या, त्यांची लक्षणे, उपचार, घ्यावयाची काळजी याविषयी मार्गदर्शन केले.

विद्याभवन स्कूलच्या प्राचार्या डॉ. सुचित्रा साठे म्हणल्या कि,
शाळेतील मुलींचे सबलीकरण व सक्षमीकरण घडवून आणण्यासाठी विविध उपक्रम कार्यक्रमांचे राबवणे गरजेचे आहे, मुलींना भविष्यकाळात स्वतःच्या पायावर उभे राहवे. शिक्षण हे समाज सुधारण्याचे एक महत्त्वाचं साधन आहे म्हणून मुलींना शिक्षण घेण्याविषयी जागरूक राहिले पाहिजेत, मुलगी शिकली तर ती स्वतःचं घर, समाज, देशाला राष्ट्राला सक्षम करते म्हणून मुलींचं महिलांचं सक्षमीकरण व सबलीकरण करणे ही काळाची गरज आहे.

यावेळी प्राचार्य डॉ डी एस भापकर व महाविद्यालयाचे विभाग प्रमुख डॉ पी एम वाघमारे यांनी मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन प्रा जयश्री धोंडे यांनी तर आभार सीमा सोनवणे यांनी मानले. कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी प्रा निलंबिका इंगलगी,प्रा बी. बी कासले , पी.बी गायकवाड, व्ही सी चौधरी, सीमा सोनवणे तसेच शिक्षकेतर कर्मचारी सुनिता मुळूक,शुभांगी रसाळ यांनी परिश्रम घेतले .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button