सामाजिक

रोटरी क्लब ऑफ पिंपरी एलीटच्या अध्यक्षपदी इरफान आवटे

आवटे हे सामाजिकतेची जाण असलेले अध्यक्ष - मराठे

पिंपरी (प्रतिनिधी) रोटरी क्लब ऑफ पिंपरी
एलीटच्या अध्यक्षपदी इरफान आवटे तर सरचिटणीसपदी अनिल भांदुर्गे यांची निवड करण्यात आली.
यावेळी प्रांतपाल संतोष मराठे, सहाय्यक प्रांतपाल प्रणिता आलुरकर, रविंद्र भावे यांच्यासह, शितल आवटे व रोटरॅक्ट क्लबचे माजी अध्यक्ष आर्यन आवटे आदी उपस्थित होते.

कार्यकारिणी मंडळ पुढीलप्रमाणे
इरफान आवटे (अध्यक्ष),अनिल भांदुर्गे ( सचिव),महादेव शेंडकर( तत्कालीन अध्यक्ष),सचिन मोरे( नियोजित अध्यक्ष), स्मिता रानमळे (खजिनदार),जिनेश गांधी(प्रशासन),अनिल नेवाळे( सदस्यत्व),गिरीश कुलकर्णी(आयटी),अतुल अर्जुनवाडकर(इमेज),शीतल अर्जुनवाडकर( टी आर एफ),मीता ठाकूर( युवा), राहुल सोमाणी( क्रिडा),रश्मी भावे( इव्हेंट्स), चंद्रकांत पाटील( सीएस आर),अशोक शिंदे ( ग्लोबल ग्रँट),रविंद्र भावे ( मेंटॉर)
यावेळी प्रांतपाल संतोष मराठे म्हणाले की, अध्यक्ष इरफान आवटे हे सामाजिकतेची जाण असलेले एक यशस्वी उद्योजक आहे. त्यांनी गरजू लोकांना अनेक वेळा मदत करीत असतात. विशेष त्यांनी कोरोना काळात शासकीय रुग्णालय व शाळांना फॉगिंग मशीनची मदत केली आहे.गरजू रुग्णांना व गरीब परिस्थितीतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य मदत केली. आहे गरजू लोकांना वस्त्रदान, अन्न धान्य दान अशी मदत केली आहे.ते समाजसेवेच्या कार्यात अग्रेसर असतात.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रद्धा भांदुर्गे तर आभार सचिन मोरे यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button