पिंपरी चिंचवडसामाजिक

दुचाकी फेरी काढून महिला दिन साजरा

लेवाशक्ती महिला महामंचाच्या अध्यक्षा रेखा भोळे यांचा पुढाकार

चिंचवड (प्रतिनिधी) लेवाशक्ती महिला महामंचच्या वतीने महिला दिनानिमित्त वाल्हेकरवाडी – रावेत – निगडी परिसरातून भव्य दुचाकी रॅली काढून महिला दिन साजरा करण्यात आला.
या फेरीची सुरुवात वाल्हेकरवाडी येथील चिंतामणी मंदिरा समोरून महिलांच्या हस्ते झेंडा दाखवून करण्यात आली.
डॉ अनुजा फालक, कविता कोल्हे, कांचन ढाके, डॉ हर्षाली नेमाडे, महामंचाच्या अध्यक्षा रेखा भोळे आदी उपस्थित होते.
या फेरीत गुलाबी फेटे बांधून, हातात विविध संदेश देणारे फलक घेवून सुमारे ३०० महिला सहभागी झाल्या होत्या.

चिंतामणी मंदिर या ठिकाणी या रॅलीला प्रारंभ झाला.
वाल्हेकरवाडी- राज कॉलनी- भोंडवे कॉर्नर- डिवाय पाटील कॉलेज रोड-आकुर्डी रेल्वे स्टेशन-प्राधिकरण या मार्गे निघाली.निगडीतील ज्ञानेश्वर गार्डन या ठिकाणी या रॅलीची समाप्ती करण्यात आली.यावेळी सहभागी महिलांना भेटेवस्तू व प्रमाणपत्र देवून सन्मानित करण्यात आले.
रॅलीच्या आयोजनासाठी गौरी सरोदे, चारूलता चौधरी, शितल नारखेडे, योगिता नारखेडे, किरण पाचपांडे, दीपाली नारखेडे, लीना बोरोले, विभावरी इंगळे,रजनी बोंडे , ज्योती ढाके, योगिनी बऱ्हाटे विजया जंगले, शर्मिला कोळंबे यांनी विशेष परिश्रम घेतले.तर
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी संगीता बोरोले,पल्लवी वायकोळे, शारदा परतणे, रुपाली गाजरे, शीतल नारखेडे यांचे विशेष सहकार्य लाभले .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button