रोटरी क्लब ऑफ डायनॅमिक भोसरी अध्यक्षपदी डॉ.संतोष मोरे,सचिवपदी डॉ योगेश गाडेकर
भोसरी क्लब हा प्रेरणादायी क्लब - संतोष मराठे

पिंपरी (प्रतिनिधी) रोटरी क्लब ऑफ डायनॅमिक भोसरीच्या २०२५-२६ नूतन कार्यकारिणीचा पद व पदग्रहण सोहळा मोशी येथे प्रांतपाल ३१३१ रो.संतोष मराठे व झोन २ चे सहायक प्रांतपाल रो.अशोक शिंदे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

यानंतर प्रमुख पाहुणे रो.संतोष मराठे, सहायक प्रांतपाल रो.अशोक शिंदे, क्लब संस्थापक डाॅ.अशोककुमार पगारिया, माजी अध्यक्ष रो.रामदास जैद,रो.ज्ञानेश्वर विधाते,मावळते अध्यक्ष रो.दीपक सोनवणे, नवनिर्वाचित अध्यक्ष रो.संतोष मोरे,नवनिर्वाचित सचिव रो.योगेश गाडेकर,व कार्यकारिणी सदस्यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करण्यात आले.
यानंतर मावळते अध्यक्ष रो.दीपक सोनवणे यांनी गेल्या वर्षभरात केलेल्या सामाजिक कार्याची व्हिडिओ क्लिपद्वारे माहिती दिली.व सहकाऱ्यांचे आभार मानले.व नवनिर्वाचित अध्यक्ष रो.संतोष मोरे यांना अधिकारांचे हस्तांतरण करत नूतन अध्यक्ष व कार्यकारिणीला शुभेच्छा दिल्या.नूतन सेक्रेटरी रो.डाॅ.योगेश गाडेकर यांनी मावळते सचिव रो.डाॅ.संतोष मोरे यांनी सूत्रे प्रदान केली.
नवनिर्वाचित अध्यक्ष डॉ मोरे यांनी आपल्या मनोगतात सर्वांना बरोबर घेऊन या सामाजिक बांधिलकीचा सेवाभाव जपत कारकीर्द यशस्वी करण्याचा संकल्प करण्याचा संकल्प केला.
रो.अशोककुमार पगरिया,रामदास जैद,रो.ज्ञानेश्वर विधाते,दिपक सोनवणे,रो.संतोष मोरे,रो.योगेश गाडेकर यांनी तसेच उपस्थितांच्या टाळ्यांच्या गजरात अध्यक्षीय पुरस्कार रो.विजय गोरडे,बेस्ट रोटरी कपल पुरस्कार रो.ज्ञानेश्वर विधाते व सुनिता विधाते,बेस्ट सर्व्हिस प्रोजेक्ट पुरस्कार रो.दत्तात्रय कोल्हे,बेस्ट क्लब प्रेजेन्स पुरस्कार रो.आण्णासाहेब मटाले,रोटरी सेवा समर्पण पुरस्कार रो.अमितकुमार त्रिपाठी तर रोटरी एक्सलन्स पुरस्कार डॉ.गजानन मंकीकर,स्टार ऑनररी लेडी मेंबर सन्मान दिपा दांगट तर कलासाधना पुरस्काराने रांगोळीकार पुजा काळे यांना सन्मानित करण्यात आले.
सूत्रसंचालन मिलिंद बावा,रो.केशव काळदाते यांनी तर आभार सचिव रो.डाॅ.योगेश गाडेकर यांनी मानले.
प्रांतपाल रो.मराठे म्हणाले कि,समाजातील गरीब,गरजू, उपेक्षित घटकांना शोधून त्यांना शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, कला, संस्कृती प्रबोधन इ. क्षेत्रातील रोटरी क्लब ऑफ डायनॅमिक भोसरीने केलेले कार्य इतरांना प्रेरणादायी आहे.




