
पिंपरी(प्रतिनिधी) जागतिक नृत्य दिनानिमित्त निगडी येथील नृत्य कला मंदिर आणि नृत्य तेज कला अकॅडमी च्या वतीने उदया दि. २९ रोजी पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती तेजश्री अडिगे यांनी दिली
दि २९ रोजी गदीमा नाट्यगृह येथे संध्या ५ वा हा कार्यक्रम होईल.
यावेळी विघ्नेश साळुंखे या उत्कृष्ट बाल कलाकार पुरस्कार, आशुतोष सांखे यांना उत्कृष्ठ युवा पुरस्कार, सुप्रिया धाईंजे यांना उत्कृष्ट नृत्य रचनाकार पुरस्कार देण्यात येणार आहे. तसेच आशा नेगी आणि जुई सुहास यांना तेजस्विनी पुरस्कार देवून गौरविण्यात येणार आहे
[ : नृत्य कला मंदिर गेली 30 वर्ष सातत्याने नृत्य प्रशिक्षणाचा कार्य करणारी पिंपरी चिंचवड मधील अग्रगण्य संस्था आहे..
या संस्थेने स्थानिकच नाही देशाविषयी विदेशात आपल्या कार्यक्रमाचे झेंडे रोवलेत ..
यावर्षी आपल्या सर्वांच्या शुभेच्छांनी नृत्य कला मंदिर त्रिदशकपूर्ती करते आहे
नेहमीच प्रमाणे दोन आठवड्याचे लोकनृत्य भारतीय सेमी क्लासिकल नृत्य प्रशिक्षण शिबिरचा समारोप उद्या जागतिक नृत्य दिनी होईल.
४ ते ५५ वयोगतील मुली आणि स्त्रिया आपली कला सादर करतील आणि या वेळच्या शिबिराच उद्देश आहे जागर नारीशक्तीचा हा आहे.
जागतिक नृत्य दिनाच्या निमित्ताने गेली अनेक वर्ष नृत्य कला मंदिर उत्कृष्ट बालकलाकार उत्कृष्ट युवा कलाकार आणि उत्कृष्ट नृत्य दिग्दर्शिका यांना पुरस्कृत करत आहे यावर्षी यांच्यासोबत स्त्री शक्तीचा सन्मान करणाऱ्या दोन महिलांचा विशेष सन्मान करण्यात येणार आहे.
मुखत्वे करून नृत्य शिबिराचा समारोप जगभरातील विविध नृत्यने करणार आहोत लिहून नृत्य लोकनृत्य उपशास्त्रीय नृत्य बॉलीवूड नृत्य सादर होणार आहे.




