ब्रिजश्याम कलाकुंजच्या विद्यार्थ्यांनी “छंद अंग-लीला”तून नृत्यांजली
पं. कपोते,विदुषी ममता महाराज यांची उपस्थिती

पाषाण (प्रतिनिधी) पद्मविभूषण पं.बिरजू महाराज यांच्या कन्या विदुषी ममता महाराज संचलित ब्रिजश्याम कलाकुंजच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या “छंद अंग-लीला” हा नृत्यांजली वाहिली.

यावेळी प्रमुख पाहुणे नर्तक पं.नंदकिशोर कपोते,पं. सुधाकर चव्हाण आणि डीपीयूचे कुलगुरू एन.जे पवार,विशेष अतिथी ब्रिगेडियर उमेश कुमार ओझा , उस्ताद राईस बाले खान , जयश्री जंगम, ब्रिजश्याम कलाकुंजच्या संचालिका विदुषी ममता महाराज आदी मान्यवर उपस्थित होते.
हा नृत्य कार्यक्रम सीपीआर सभागृह, पाषाण रोड, पुणे येथे संपन्न झाला.
या दरम्यान प्रशिक्षित नृत्यगणांनी लयबद्ध भावपूर्ण हालचाली, सूर आणि तालावर अंगभूत लयबद्ध व दमदार पदलालित्या सादर केले, तसेच घुंगुरवाद्यांच्या तालावर जुगलबंदीचा अनुभव, तत्कार, तोडे, गत, आणि नायक-नायिका भेदासारखे भाग , जे कथ्थक नृत्याचे मुख्य घटक असलेले कथ्थकचे सादरकरण करून रसिकांना भुरळ पाडली.
यावेळी रोहिणी कुलकर्णी, सीमा मठ, सुरवी मठ, मंजुश्री शर्मा, रिमा मोहिते, वर्षा पोवार, पद्मीनी सोनवणे, स्नेहा कासार, श्रुती शिरोडकर, कात्यायनी माथूर, तन्वी मजगे, आध्या शुक्ला, आर्या श्रीमाळी , ज्ञानदा गोरे, नेहा शर्मा,साची म्हात्रे , दिव्यांगी तिवारी,आर्या श्रीमाळी ,अस्मिता अल्बल, रेवा शर्मा, के.नुपूर , आध्या रावल ,किमाया देशपांडे, देवांशी तांबे, अर्चिशा देऊळकर, पृथा सागवेकर,अवनी इनामदार, शांभवी गाडवे, श्रावणी होले, जान्हवी कुलकर्णी यांनी नृत्य सादर करून रसिकांना मंत्रमुग्ध केले.
यावेळी शिष्या रश्मी पांडकर आणि आरुषी पांडकर, रागिणी महाराज आणि यशश्विनी महाराज यांनी विशेष आणि नाविन्यपूर्ण नृत्यविष्कार करून टाळ्यांची दाद मिळवली.




