क्राईमआरोग्यसामाजिक

पॉझिटिव्ह स्टोरी: १५ कैद्यांना मिळाली दृष्टी

जिल्हा रुग्णालयात डॉ कुलकर्णी यांनी कैदयांवर केली शस्त्रक्रिया

येरवडा कारागृहातील १५ कैद्यांची मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया
पिंपरी(प्रतिनिधी) सांगवी येथील जिल्हा रुग्णालय औंध च्या वतीने मध्यवर्ती खुले कारागृह येरवडा व समता फौंडेशन यांच्या सहकार्याने जिल्हा मध्यवर्ती खुले कारागृह येरवडा येथे मोफत नेत्र तपासणी व चष्मे वाटप शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरामध्ये १५ मोतीबिंदू रुग्ण आढळून आले असून त्या सर्व १५ रुग्णांची मोतीबिंदू शस्त्रक्रिया नुकतीच जिल्हा रुग्णालय औंध येथे सिव्हील सर्जन डॉ. नागनाथ यमपल्ले, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ लव्हेकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा नेत्रशल्य चिकित्सक डॉ. अंजली कुलकर्णी आणि डॉ. प्रज्ञा निकम यांनी यशस्वीरित्या केल्या.

या शिबिरासाठी डॉ प्रिया हरिदास, डॉ प्रियदर्शनी जगदाळे, येरवडा कारागृहाचे अधीक्षक सुनील ढमाळ, समता फौंडेशनचे अध्यक्ष विवेक मोकळकर , फिजिशियन, भुलतज्ज्ञ, पॅथालॉजिस्ट, नेत्र शस्त्रक्रिया विभाग सर्व सिस्टर व इतर स्टाफ, नेत्रअंतर्गत रुग्ण विभाग सर्व सिस्टर व इतर स्टाफ व नेत्रचिकित्सा अधिकारी यांचे सहकार्य मिळाले.
यावेळी जिल्हा नेत्र शल्यचिकित्सक डॉ कुलकर्णी म्हणाल्या कि, या कैद्यांची येरवडा कारागृहात जावून तपासणी केल्यावर मोतीबिंदू मुळे दृष्टी कमी झाली होती.
या मोतीबिंदूचे काचबिंदूत रूपांतर होऊन कायमचे अंधत्व आले असते.
मग माणुसकीच्या नात्याने त्यांना कायद्याच्या चौकटीत बसवून कडक बंदोबस्तात रुग्णालयात आणण्यात आले.
हे कैदी ६० ते ७५ या वयोगटातील होते. त्यातील बरेच जण जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. यांच्या शास्त्रक्रियेसाठी कुणीच पुढे येत नव्हते. मात्र आम्ही रुग्णसेवा हीच ईश्वर मानून १५ कैद्यांची शास्त्रक्रिया केली.
आज त्यांना दृष्टी मिळाल्याने त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद ओसंडून वाहत होता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button