सामाजिक

संत सावता महाराज संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त सावता पुरस्कार जाहीर

मंत्री जयकुमार गोरे यांचा होणार नागरी सत्कार

लोंढे,जगताप,भुजबळ,विधाटे यांना पुरस्कार जाहीर

पिंपरी ( प्रतिनिधी )चिंचवड येथील महात्मा जोतिबा फुले मंडळाच्या वतीने दि २ ऑ. रोजी, सायं ५ वा. चिंचवड येथील प्रा. मोरे प्रेक्षागृह येथे श्री संत शिरोमणी सावता महाराज संजीवन समाधी सोहळ्या निमित्त विविध पुरस्कार व विद्यार्थी गुणगौरव सोहळा संपन्न होणार असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष हणमंत माळी यांनी दिली.

हा सोहळा दुग्ध विकास, अपारंपारिक ऊर्जा व ओबीसी कल्याण मंत्री अतुल सावे व खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या हस्ते पुरस्कार वितरण,विद्यार्थी सत्कार व ग्राम विकास, पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे यांचा नागरी सत्कार सोहळा संपन्न होणार आहे.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून महिला आयोग अध्यक्षा रूपालीताई चाकणकर,आ.शंकर जगताप आदी उपस्थित राहणार आहे.
याप्रसंगी यावर्षीचा संत सावता भूषण पुरस्कार संतोष लोंढे यांना तर संत सावता कृषीरत्न पुरस्कार, हभप मुरलीधर भुजबळ ( पुनावळे) व दिलीपमामा विधाटे ( साळुंब्रे,ता.मावळ) या प्रगतिशील शेतकऱ्यांना पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. तर यावर्षीचा संत सावता उद्योग रत्न पुरस्कार संजय जगताप यांना जाहीर झाला आहे.तसेच स्पर्धा परीक्षेत यशस्वी झालेल्या व समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे.

यावेळी संत सावता महाराज यांचे वंशज सावता महाराज वसेकर,माजी महापौर अपर्णा डोके, जेष्ठ नेते भाऊसाहेब भोईर, उप अधीक्षक निखिल पिंगळे,उद्योजक दीपक कुदळे, पोलिस निरीक्षक शत्रुघ्न माळी, वंसतनाना लोंढे, सुरेश म्हेत्रे, प्रशांत डोके,सीए सुहास गार्डी, इत्यादी पदाधिकारी उपस्थित राहणार आहे. समिता गोरे यांच्या पुढाकाराने मोफत मधुमेह तपासणी शिबिराचे आयोजन केले आहे.
या सोहळ्यास समाज बांधवांनी या कार्यक्रमास मोठय़ा संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन अध्यक्ष हणमंत माळी यांनी केले आहे. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी मंडळाचे प्रशांत डोके, सुर्यकांत ताम्हाणे,अनिल साळुंके,विश्वास राऊत,महादेव भुजबळ, निलेश डोके,नितीन ताजणे, वैजनाथ माळी,विलास शेंडे, नरहरी शेवते.किशोर माळी. निखिल यादव,अजित भोसले, केशव ताजणे,शिवम् बर्के,पोपट ताजणे,प्रदीप दर्शले,अमर ताजणे, अनिता ताठे, उर्मिला भुजबळ,आशा माळी,वृषाली ताजणे,कुंदा यादव, स्मिता माळी,शारदा राऊत, पुजा साळुंके,सीए सुहास गार्डी,हर्षद भुजबळ,श्रीहरी हरळे,प्रकाश गोरे,नवनाथ कुदळे,कौशल माळी,परेश ताम्हाणे,रमेश गायकवाड, अशोक टिळेकर यांनी पुढाकार घेतला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button