महाराष्ट्रसामाजिक

पुस्तकांची गुढी उभारुन धारे दाम्पत्याने दिला पुस्तक वाचनाचा संदेश*

जालन्यातील धारे दांपत्याचे होतय कौतुक

जालना(प्रतिनिधी) मोबाईल च्या अतिवापरामुळे वाचन संस्कृती लोप पावत चालली आहे. अशा कठीण परिस्थितीत संतोष धारे यांनी वाचन चळवळ मजबूत करण्याचा निश्चय केला आहे. गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर नव्या वर्षाचे स्वागत करण्यासाठी धारे दाम्पत्याने ‘पुस्तकांची गुढी’ उभारून समाजास योग्य दिशा दाखवली आहे. या अभिनव उपक्रमातून त्यांनी समाजास ‘वाचाल तर वाचाल’ असा अनमोल संदेश दिला आहे.
संतोष धारे जालना शहरातील रहिवासी असून त्यांनी सन २०२४ या वर्षात शाळा व व्यक्ती यांनी ३६५ पुस्तके भेट दिली. लोकांनी वाचन करावे यासाठी ते सतत प्रोत्साहन देत असतात.
गुढीपाडव्याच्या दिवशी उभारलेल्या ‘पुस्तकाच्या गुढी’त त्यांनी भारतीय संविधानाची प्रास्ताविका सुध्दा लावली होती. हे दाम्पत्य मागील ५ वर्षांपासून लोकांना संविधानाची प्रास्ताविका भेट देतात. त्यांचे असे मत आहे की दैनंदिन जीवनात लोकांनी संवैधानिक मूल्यांचे पालन करायला पाहिजे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button