सर्वाधिक मोतीबिंदू शस्त्रक्रिया करून पुणे जिल्हा राज्यात प्रथम
अंजली कुलकर्णी यांच्या टीमची केल्या १ लाख ३४ हजार शस्त्रक्रिया

पिंपरी (प्रतिनिधी) राज्य शासनाच्या आरोग्य विभागाकडून एप्रिल २०२४ ते मार्च २०२५ अखेरपर्यंत १ एप्रिल या कालावधीत राष्ट्रीय अंधत्व व दृष्टी क्षीणता नियंत्रण कार्यक्रम राबविण्यात आला. 
या कार्यक्रमा अंतर्गत सांगवी येथील औंध जिल्हा रुग्णालयाच्या टीमने १ लाख, ३४ हजार २९२ मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आल्या असून राज्य शासनाने सदर वर्षात दिलेले उद्दिष्ट पूर्ण करून पुणे जिल्ह्याने राज्यात प्रथम क्रमांक पटकावला .
त्यामध्ये औंध जिल्हा रुग्णालयासह, पुणे महापालिका, पिंपरी-चिंचवड महापालिका, वैद्यकिय महाविद्यालय, अशासकिय स्वयंसेवी संस्था व खाजगी रुग्णालये यांचा सहभाग आहे. या सर्व रुग्णालयातील डॉक्टर्स, नर्सिंग स्टाफ, नेत्रचिकित्सा अधिकारी व कर्मचाऱ्यांचे सहकार्याने हे उद्दिष्ट गाठता आले.अशी माहिती जिल्हा नेत्र शल्य चिकित्सक डॉ अंजली कुलकर्णी यांनी सांगितले.
वैद्यकीय उप संचालक डॉ राधाकृष्ण पवार, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागनाथ यम्पल्ले यांच्या मार्ग दर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली.
कार्यक्रम अंतर्गत जिल्ह्यातील मोतिबिंदु शस्त्रक्रिया, नेत्रबुब्बुळे जमा बाबत, शालेय विद्यार्थ्यांच्या नेत्र तपासणी व चष्मे वाटप, नेत्र शल्य चिकित्सक निहाय शस्त्र क्रिया अहवाल व डोळ्यांच्या इतर नेत्र शस्त्र क्रियाबाबत भौतिक व आर्थिक अहवाल या आयुक्तालयामार्फत दरमहा केंद्र शासनास सादर करावा लागतो.
पुणे जिल्ह्याला ९१२१२ शस्त्रक्रिया करण्याचे उद्दिष्ट्ये दिले असता १३४२९२ जणांच्या शस्त्रक्रिया करून १४७ टक्के गुण मिळवून राज्यात प्रथम क्रमांक मिळवला.
तर वर्धा जिल्ह्याला १२५८२ जणांची शास्त्रक्रिया करण्याचे उद्दिष्ट्ये पार करून १८१७३ जणांची शास्र्रक्रिया करून १४४ टक्क्याने दुसरा क्रमांक मिळवला.
सांगली जिल्ह्याने दिलेले २७२९९ उद्दिष्ट्ये पार करून ३४८९४ जणांच्या शास्त्रक्रिया करून १२८ टक्के गुण मिळवत तिसरा क्रमांक मिळवला.
नाशिक जिल्ह्याला ५९०७६ शस्त्रक्रिया करण्याचे उद्दिष्ट्ये पार करून ७२५८७ जणांची शास्त्रक्रिया करून १२३ टक्के मिळवून चौथा क्रमांक मिळवला.
तसेच सोलापुर जिल्ह्याला ४१७६६ शाश्त्रक्रिया करण्याचे उद्दिष्ट्ये पुर्ण करून ४६२१२ जणांच्या शास्त्रक्रिया केल्या.१११ टक्के गुण मिळवून राज्यात पाचवा क्रमांक मिळवला.
[ तसेच यवतमाळ, भंडारा, नागपुर या जिल्हयांचे देखिल शासकिय विभागात ८० टक्के पेक्षा जास्त उद्दीष्ट साध्य झाले आहे.शासकिय विभागात जास्तीत जास्त मोतिबिंदु शस्त्रक्रिया करण्याकरीता योग्य ते नियोजन करण्यात यावे.आपल्या जिल्हयातील जिल्हा रुग्णालया व्यतिरीक्त इतर १०० बेडेड उपजिल्हा रुग्णालयात स्वतंत्र (dedicated) मोतिबिंदु शस्त्रक्रिया गृह कार्यान्वित करण्यात यावे. जेणे करुन मोतिबिंदु रुग्णांना जास्तीत जास्त सेवा उपलब्ध करुन देणे शक्य होईल.
जळगाव, धुळे, रायगड, अहमदनगर, वर्धा या जिल्ह्यात शासकिय विभागात दोन नेत्रशस्त्र क्रिया गृह कार्यान्वित आहेत. तसेच दोन ते तीन नेत्र शल्य चिकित्यक उपलब्ध असताना १५ टक्के पेक्षा कमी उद्दीष्ट साध्य झाले ही अत्यंत खेद जनक बाब आहे.
ऊ) प्रपत्र-६ डोळयांच्या इतर नेत्र शस्त्रक्रिया
डोळयांच्या इतर नेत्र शस्त्र क्रियांच्या माहे एप्रिल, २०२४ ते मार्च, २०२५ च्या अहवालानुसार बुलढाणा जिल्हयांनी डोळयांच्या एकही इतर नेत्र शस्त्र क्रिया/ तपासणी करण्यात आल्या नसल्याचे निदर्शनास येते तसेच धुळे, जळगाव, बीड व मुंबई या जिल्हयांची डोळ्यांच्या इतर शस्त्रक्रिया / तपासणी संख्या देखिल कमी असल्याचे निदर्शनास येत आहे.
सन २०२५-२६ मध्ये जिल्हयांत तिरळेपणा, काचबिंदु व डायबेटीक रेटीनोपॅथी रुग्णांची शिबिरे आयोजित करुन तपासणी व उपचार करण्यात यावेत.
उपरोक्त नमुद केल्याप्रमाणे राष्ट्रीय अंधत्व व दृष्टी क्षीणता नियंत्रण कार्यक्रम अधिक प्रभावीपणे राबविण्याकरीता आपल्यास्तरावरुन योग्य ती कार्यवाही करण्यात यावी व उपरोक्त निर्देशांच्या अनुषंगाने व कार्यक्रमाची उद्दिष्ट साध्य करताना सेवांची गुणवत्ता वाढविण्यावर भर द्यावा. असा आदेश शासनाने जिल्हा स्तरीय अधिकाऱ्यांना देण्यात आला होता. तरी देखील काही जिल्ह्यात प्रभाव दिसून आला नाही.




