शैक्षणिकपिंपरी चिंचवड

नाविण्यपूर्ण तंत्रज्ञानाच्या आधारावरच शाश्वत विकास शक्य – कल्याण पवार

डिवाय पाटील एमबीए आणि एमसीए कॉलेजच्या अंतराराष्ट्रीय परिषदेचे उदघाटन

आकुर्डीः शाश्वत विकास म्हणजे आर्थिक, सामाजिक आणि पर्यावरणीय समतोल होय. या तीनही गोष्टींचा समतोल अत्यंत महत्वाचा आहे. या गोष्टी करायच्या असतील तर नाविण्यपूर्ण तंत्रज्ञानाच्या सहाय्याने शक्य होईल. यामध्ये स्वच्छ उर्जा, हरित उर्जा, अक्षय उर्जा या क्षेत्रांध्ये उद्योजकांनी उद्योगशिलता दाखवावी. असे मत एंडुरंस टेक्नॉलॉजीचे कार्यकारी उपाध्यक्ष कल्याण पवार यांनी व्यक्त केले.

आकुर्डी येथील डॉ. डी. वाय. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज आणि डॉ. डी. वाय. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मास्टर्स ऑफ कॉम्प्यूटर अॅप्लीकेशन अॅण्ड मॅनेजमेंट यांच्या संयुक्त विद्यमाने दोन दिवशीय आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते.

यावेळी वर्ल्ड एम कंपनीचे संचालक जस्पर फोर्चून, पोसको कंपनीचे चिरंजीव मैनी, विलो मॅथर च्या एच आरच्या महाव्यवस्थापक कल्याणी कुलकर्णी,डॉ .डी .वाय पाटील संस्थेच्या व्यस्थापकीय संचालिका (क्वालिटी अ‍ॅश्युरन्स )डॉ . श्वेता चव्हाण पाटील, डी .वाय पाटील एज्युकेशनल कॉम्प्लेक्सचे संचालक रिअर ऍडमिरल अमित विक्रम , सल्लगार संचालक प्रा डी आर करुनूरे, कॉर्पोरेट रिलेशन्स प्रमुख डॉ जयसिंग पाटील, डी .वाय पीआयएमसीएच्या संचालिका डॉ के निर्मला,डिवायपीआयएमएसचे प्र संचालक ललित प्रसाद आदी उपस्थित होते.

कल्याणी कुलकर्णी की, चाणक्य नितीनुसार आपण इतरांच्या चुकांमधून जास्त शिकतो. कोणताही व्यवसाय करत असताना आपल्याला चांगला मार्गदर्शक असावा लागतो, असे त्यांनी सांगितले.

डी. जसपर फोरच्युन म्हणाले की, कल्पनाशक्तीमध्ये खूप ताकत असते. आपण जर शाश्वत विकासासाठी कल्पनाशक्तीचा वापर केला तर आपण व्यवसाय करताना भेडसावणा-या समस्यांवर मात करु शकतो.

श्री मैनी म्हणाले की, शाश्वत विकास म्हणजे निसर्गाला ईजा न पोहोचता केलेला विकास, जो येणा-या पिढ्यांसाठी चिरंतन टिकेल. त्यांनी सांगितले की, प्लास्टिकचा वापर न करता ज्या गोष्टी पुन्हा-पुन्हा वापरण्यात येतील अशा गोष्टी बनविण्यामध्ये व्यावसायिकांनी अंगिकारल्या पाहिजेत.

अॅडमिरल (नि) अमित विक्रम म्हणाले की, एका बाजूला तंत्रज्ञान झापाटयाने बदलत आहे. तर दुस-या बाजूला पर्यावरणीय बदल सुद्धा मोठ्या प्रमाणावर होत आहेत. जागतिक आव्हानांचा फटका अर्थव्यवस्थेला बसणार आहे. भरताचा जर विचार केला तर अक्षय उर्जा आणि तिचे स्त्रोत यावर काम करण्यासाठी भरपूर वाव आहे आणि ते एक शाश्वत विकासाचे उत्तम उदाहरण ठरेल.

डॉ. श्वेता चव्हाण म्हणाल्या की, डिवाय पाटील
संस्थेने नेहमीच कॉर्पोरेट क्षेत्रासाठी दर्जेदार व्यवस्थापकीय कौशल्य असलेले नेतृत्व घडविण्यावर भर दिला आहे. तसेच संस्था सामाजिक मुल्ये त्यांच्यामध्ये रुजविण्याचे काम करते व हे सर्व शाश्वत विकासाचा भाग म्हणून संस्था योगदान देत आहे.
प्रसाद म्हणाले कि, परिषदेचा विषय हा शाश्वत उद्योजकता आणि स्टार्ट-अप इको-सिस्टीम जागतिक आव्हाने आणि संधी आहे. हा विषय आजच्या घडीला अत्यंत महात्वाचा आहे,
सदर परिषदेच्या उद्घाटनाचे सुत्र संचालन प्रा. मिनल वाघ यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. डॉ. अविनाश पवार यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button