आरोग्य

राष्ट्र सक्षम करण्यामध्ये प्रत्येकाने योगदान द्यावे- डॉ.सुब्रमण्यम

युवा महाकॉनमध्ये चारशे भूलतज्ञांचा सहभाग

पिंपरी (प्रतिनिधी) जगाने भरातकडून काहीतरी शिकावे यासाठी आपण सर्वांनी राष्ट्र सक्षम करण्यासाठी योगदान दिले पाहिजेत.एपीजे अब्दुल कलाम यांच्या स्वप्नातील सुपर पॉवर इंडिया घडवायचा आहे.असे मत अखिल भारतीय भूलतज्ञ संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. जे बालाव्यंकट सुब्रमण्यम यांनी व्यक्त केले.

पिंपरी चिंचवड भूलतज्ञ संघटनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या “युवा महाकॉन-२०२५ ” या तीन दिवशीय राष्ट्रीय परिषदेचे उदघाटन डॉ सुब्रमण्यम यांच्या हस्ते आकुर्डी येथे करण्यात आले.यावेळी ते बोलत होते.
यावेळी महाराष्ट्र भूलतज्ञ संघटनेच्या अध्यक्षा डॉ अनिता नेहेते,उपाध्यक्ष डॉ सौरभ बर्डे,सचिव डॉ राजेश तगडपल्ले, खजिनदार डॉ विकास कर्णे,पिं.चिं भुलतज्ञ संघटनेचे अध्यक्ष डॉ. भावेश शेठ, भुलतज्ञ ट्रस्टचे अध्यक्ष डॉ सुमित लाड, सचिव तथा जी.सी सदस्य डॉ माया भालेराव, कोषाध्यक्ष डॉ सीमा सूर्यवंशी,पिं चिं शाखा सचिव डॉ उमा देशमुख, खजिनदार डॉ बागेश्री वाबळे आदी मन्यावर उपस्थित होते.
या परिषदेमध्ये वय वर्ष ४५ आतील भूलतज्ञ मार्गदर्शन केले. देशभरातील सुमारे 400 भुलतज्ञ सहभागी झाले होते. या परिषदेमध्ये भुलशास्त्र विषयांमध्ये दिवसेंदिवस बदलत असलेले अत्याधुनिक तंत्रज्ञान , सुरक्षित, अद्यावत वैद्यकीय सुविधेचा वापर कसा करावा. यावर चर्चा करण्यात आली.
परिषद यशस्वी करण्यासाठी डॉ सचिन वाघ, सचिव आशिष पटनी, मयुरेश उमाळकर, डॉ वर्षा कुऱ्हाडे, डॉ सारिका लोणकर, डॉ सुचिता अंकोलीकर, डॉ शुभांगी कोठारी आदी सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ भावेश शेठ यांनी केले सूत्रसंचालन डॉ शुभांगी कोठारी यांनी तर आभार डॉ उमा देशमुख यांनी मानले.

फोटो ओळ-
डावीकडून डॉ.बागेश्री वाबळे, डॉ.शुभांगी कोठारी, डॉ.आशिष पटनी, डॉ.सचिन वाघ, डॉ.सुमीत लाड, डॉ.माया भालेराव, डॉ.मनिषा सपाटे, डॉ.राजेश तगडपल्ले, डॉ.अनिता नेहेते, डॉ.जे बालावेंकट सुब्रमण्यम, डॉ.भावेश शेठ,डॉ सौरभ बरडे, डॉ. विकास कर्णे, डॉ.उमा देशमुख, डॉ.सारिका लोणकर आणि डॉ.चाम

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button