शैक्षणिक

सायबर गुन्हे रोखण्यासाठी सायबर सुरक्षा अधिक सक्षम हवी -डॉ. शेंग लुंग पेंग

डीवाय पाटील इंजि कॉलेजच्या शोधनिबंध परिषदेत प्रतिपादन

पिंपरी (प्रतिनिधी ) पुणे शहर हे टेक्नॉलॉजीचे केंद्र बनले आहे व पुण्यामध्ये संगणकीय ज्ञान प्रगत असून सायबर सुरक्षेच्या नवनवीन कल्पना उदय होतो.आजच्या युगात खरी प्रगती ही सायबर सुरक्षितेने करू शकतो, सध्या सायबर गुन्हे वाढत चालले आहे व ते रोखण्याकरता सायबर सुरक्षा ही अधिक सक्षम होणे गरजेचे आहे. . असे प्रतिपादन
तैवान मधील नॅशनल ताईपई युनिव्हर्सिटी ऑफ बिजनेसच्या क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी अँड डिझाईनचे संचालक डॉ. शेंग लुंग पेंग यांनी केले.

डॉ. डी वाय पाटील शैक्षणिक संकुलातील, डी वाय पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयातील दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय शोधनिबंध परिषदेच्या उदघाटनप्रसंगी ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते.

या परिषदेसाठी विशेष निमंत्रित कम्प्युटर शास्त्रज्ञ आणि, टेक्नो इंटरनॅशनल न्यू टाउन कोलकाता चे प्रा डॉ. नीलजन डे, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसच्या सहायक कन्सल्टंट स्मिता जाधव, पिंपरीच्या सायबर क्राईम डिपार्टमेंटचे पोलीस उपनिरीक्षक श्री सागर पोमन , डॉ. डी वाय पाटील शैक्षणिक संकुलाचे संचालक रियर ऍडमिरल अमित विक्रम, शैक्षणिक संकुलाचे मुख्य वित्तीय अधिकारी श्री बी एच शर्मा, महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. पी मालती, प्रशासकीय अधिष्ठाता डॉ संदीप सरनोबत, परिषदेचे समन्वयक माहिती तंत्रज्ञान अभियांत्रिकी विभागाच्या विभाग प्रमुख डॉ लतिका देसाई, स्थापत्य अभियांत्रिकी चे विभाग प्रमुख डॉ. अशोक मोरे, तसेच परिषदेचे सहसमन्वयक डॉ. कल्याण बामणे, व डॉ. तपोब्रता डे आदी उपस्थित होते.

आजच्या युगात आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग चा वापर खूप होत आहे. याचा उपयोग करून मोठमोठे स्टार्टअप यातून सुरू होत आहेत, यातूनच देशाची प्रगती साधता येईल, असे प्रतिपादन डॉ. नीलांजन डे यांनी केले.

पिंपरीच्या सायबर क्राईम डिपार्टमेंटचे पोलीस उपनिरीक्षक सागर पोमन यांनी सायबर क्राईम दिवसेंदिवस वाढत चालले आहे आणि ते रोखण्यासाठी लोकांमध्ये जागृती असणे आवश्यक आहे म्हणून सायबर सिक्युरिटी चा उपयोग अत्यंत महत्त्वाचा आहे , असे नमूद केले.

डॉ. डी वाय पाटील शैक्षणिक संकुलाचे संचालक रियर ऍडमिरल अमित विक्रम यांनी आजच्या बदलत्या परिस्थितीत मानवाच्या मूलभूत गरजा भागवण्यासाठी प्रत्येक क्षेत्रात नावीन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा वापर करणे ही काळाची गरज आहे व त्यासाठी तंत्रज्ञान संशोधनाची स्पर्धा व मागणी वाढत चालली आहे. याकरिता विद्यार्थी दशेतच संशोधनाची बीजे रोवली पाहिजेत, असे मत त्यांनी व्यक्त केले.

टाटा टेक्नॉलॉजी सर्व्हिसेसच्या असिस्टंट कन्सल्टंट स्मिता जाधव म्हणाले कि, नवीन संशोधकाने नवनवीन तंत्रज्ञान व पद्धती अमलात आणून संशोधन घडवून आणण्याची आवश्यकता आहे. कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये सायबर सिक्युरिटी चे महत्व खूप वाढले असून प्रत्येक पंधरा दिवसाला या संदर्भातील प्रशिक्षण कंपनी कर्मचाऱ्यांना देत असते.

महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ पी मालती यांनी उपस्थितांचे स्वागत करून महाविद्यालयाची माहिती दिली आणि सर्व मान्यवारांच्या उपस्थिती मुळे परिषदेमध्ये तंत्रज्ञान क्षेत्रातील नवनवीन कल्पना, संशोधन आणि ज्ञानाची देवाण-घेवाण होईल. सॉफ्ट ब्रॅंचेस जसे की कॉम्प्युटर, आयटी, याचा उपयोग कोअर ब्रॅंचेस जसे की सिव्हिल, मेकनिकल इंजिनीरिंग ब्रांच मधील दैनंदिन कामे अधिक सुलभतेने होतील, असे प्रतिपादन केले.

यावेळी परिषदेच्या समन्वयक डॉ. लतिका देसाई व डॉ. अशोक मोरे यांनी परिषदेची विस्तृत माहिती देऊन उपस्थित यांचे स्वागत केले.

तब्बल 176 शोधनिबंध या परिषदेसाठी प्राप्त झाले असून त्यातील 145 पेपर ची निवड केली आहे. एकूण 7 सत्रांमध्ये हे पेपर सादर केले जाणार आहेत. भारताच्या विविध राज्यातून विद्यार्थी, प्राध्यापक आणि संशोधक, तसेच भारताबाहेरील विविध रिसर्च स्कॉलर्स आपले संशोधन या परिषदे मध्ये सादर होतं आहेत.

ह्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आराधना चव्हाण, डॉ. सुहास पाटील यांनी केले. ह्या कार्यक्रमाची सांगता आभार प्रदर्शनाने झाली, त्यासाठी परिषदेचे सहसमन्वयक डॉ. बामणे आणि डॉ. तपोब्रता डे यांनी आभार प्रदर्शन केले.

सदर परिषदेच्या यशस्वी आयोजनासाठी, डी वाय पाटील आकुर्डी संकुलाचे चेअरमन मा. सतेज पाटील, डॉ. डी वाय पाटील प्रतिष्ठानचे विश्वस्त मा. तेजस पाटील, डॉ. डी वाय पाटील शैक्षणिक संकुलनाचे संचालक रियर एडमिरल अमित विक्रम (निवृत्त), महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सौ. पी. मालती, प्रशासकीय अधिष्ठाता डॉ. संदीप सरनोबत यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button