सामाजिकपिंपरी चिंचवड

दिदी कृष्णा कुमारी यांना रोटरी क्लब निगडी कडून इंटरनॅशनल पीस पुरस्कार प्रदान

दीदींनी दिला शांततेचा संदेश

शांतात हा आपला जन्मसिद्ध हक्क आहे –

कृष्णा दीदी रोटरी क्लब निगडीकडून दीदी यांना इंटरनॅशनल पीस अवॉर्ड प्रदान

चिंचवड (प्रतिनिधी) अनेक लोकांना असं वाटते की ते आपण वैक्तिकरित्या जागतिक शांततेसाठी योगदान देऊ शकत नाहीत. असा एक सर्वांचा गोड गैरसमज आहे. परंतु युद्ध कशामुळे होतात? मत्सर, स्वार्थ. जर हे आपल्या अंतर्मनात सुरू झाले तर शांतता देखील आपल्या आतून सुरू होते .” शांतता हा आपला जन्मसिद्ध हक्क आणि जीवन जगण्याचा मार्ग आहे. असे प्रतिपादन साधू वासवानी मिशन च्या प्रमुख दीदी कृष्णाकुमारी यांनी केले .
रोटरी क्लब ऑफ निगडीच्या वतीने साधू वासवानी मिशन च्या प्रमुख दीदी कृष्णा कुमारी यांना इंटरनॅशनल पीस अवॉर्ड देऊन चिंचवड येथे सन्मानित करण्यात आले.यावेळी त्या बोलत होत्या.
यावेळी नियोजित प्रांतपाल नितीन ढमाले, रोटरी क्लब निगडी चे अध्यक्ष सुहास ढमाले, सचिव डॉ रवींद्र कदम, माजी अध्यक्ष राणु सिंघानिया,राकेश सिंघानिया,सुजाता ढमाले,ईश्वर ठाकूर आदी मान्यवर उपस्थित होते.

कृष्णा दीदी पुढे म्हणाल्या कि,
शांतता प्रस्थापित करण्याचे सहा सोपे मार्ग अंगीकरावे, संयमी बना, वर्तमानात जगा, कृतज्ञ व्हा, क्षमा करायला शिका, बिनशर्त प्रेम करा आणि प्रत्येक दिवसाची सुरुवात देवासोबत करा आणि दिवसाचा पहिला क्षण शांततेत घालवा.हे सप्तसूत्रीचे अवलंब केले पाहिजेत.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हरदीप कौर यांनी केले. तर आभार सीए रवी राजापूरकर यांनी मानले.

फोटो ओळ डावीकडून ईश्वर ठाकूर, नितीन ढमाले, पुरस्कार स्वीकारताना कृष्णा दीदी, सुहास ढमाले, रविंद्र कदम, सुजाता ढमाले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button