
पिंपरी, दि.1८ फेब्रुवारी
विदर्भ सहयोग मंडळ निगडी पुणे तर्फे तिळगुळ हळदीकुंकू तसेच विदर्भवासीय कवींचे बहारदार कवी संमेलन रविवारी पार पडले.
विदर्भ भवन प्राधिकरण निगडी येथे आयोजित कवी संमेलनाचे उद्घाटन कवी शब्द मराठी विश्व साहित्य संमेलन संयोजक संजय सिंगलावर यांचे हस्ते झाले.

कवी गझलकार राहुल गडेकर यांचे हस्ते गजानन महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले. यावेळी कवी कीर्तनकार पुरुषोत्तम हिंगणकर महाराज यांची प्रमुख उपस्थिती होती.देवेंद्र गावंडे या कवीने ज्योत से ज्योत जलाते चलो स्तवन गीत सादर केले.
अशोक टाकळे या कवीने स्वागत गीत सादर केले.
ग्रामगीता भेट देऊन पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले.
व्यासपीठावर आयोजक विदर्भ सहयोग मंडळाचे अध्यक्ष डॉ दिगंबर इंगोले,कार्याध्यक्ष शालिग्राम तायडे, उपाध्यक्ष शारंगधर पल्हाडे, सचिव अरुण इंगळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
तसेच दरम्यान आमदार अण्णा बनसोडे यांनी कविसंमेलनास भेट दिली असता त्यांचा शाल श्रीफळ व सन्मानचिन्ह आणि ग्रामगीता भेट देऊन मंडळाचे अध्यक्ष डॉ.दिगंबर इंगोले यांचे हस्ते सन्मानित करण्यात आले.
आमदार अण्णा बनसोडे यांनी मनोगत व्यक्त केले.
विद्यार्थी एक उमलते फूल ही कविता सादर करीत
“शाळा म्हणजे ज्ञानमंदिरच आहे विद्येचे,
ज्ञानाचे साक्षात भंडार आहे या बालकांचे…………..
असे विचार सर्वप्रथम कवयित्री संध्या घणखेडे यांनी मांडले व कविसंमेलनाला सुरुवात करण्यात आली.
विदर्भवासीय 25 कवी
सर्वश्री,डॉ.ज्योती इंगोले,
वैष्णवी पोटे,वैशाली गावंडे,
रेवती काळने,उत्तम चौधरी,भूषण पवार,गजानन निमकर्डे,देवानंद गडवे,अशोक टाकळे,राजेंद्र इंगोले,विठ्ठल पाचबोले,राजेश चौधरी,दीपक जाधव,नरहरी वाघ,नागेश गव्हाड,नंदकिशोर दाभाडे,देवेंद्र गावंडे रमेश पवार,
योगिता कोठेकर,अशोक सोनवणे,सुभाष नांदुरकर,
रामकृष्ण तरुडकर यांनी वेगवेगळ्या विषयावर कविता सादर करीत उपस्थितांना रिजविले.आयोजक डॉ दिगंबर इंगोले,संयोजक विलास वानखडे कार्यक्रमाचे अध्यक्ष संजय सिंगलवार,उद्घाटक राहुल गडेकर व प्रमुख पाहुणे पुरुषोत्तम हिंगणकर यांनी मनोगत व्यक्त करताना कविता चे सादरीकरण केले.
कविता सादर करणाऱ्या सर्व कवींना गुलाब पुष्प प्रमाणपत्र,डायरी,पेन दिनदर्शिका,धनश्री दिवाळी अंक भेट देऊन सन्मानित करण्यात आले.
मंडळातर्फे दिनदर्शिका,राहुल गाडेकरक्टर्फे पेन व डायरी,शिवाजी घोडे तर्फे धनश्री दिवाळी अंक आणि विलास वानखडे तर्फे प्रमाणपत्र देवून सत्कार केला.
तसेच महिलांसाठी तिळगुळ व हळदीकुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
प्रास्ताविक,पाहुण्यांचा परिचय सूत्रसंचलन व आभार प्रदर्शन कविसंमेलन संयोजक विलास वानखडे यांनी केले.
उपस्थितांनी सहभोजनाचा आनंद घेतला.
या कार्यक्रमाचे आयोजक विदर्भ सहयोग मंडळाचे अध्यक्ष डॉ दिगंबर इंगोले,कार्याध्यक्ष शालिकराम तायडे,सचिव अरुण इंगळे तसेच कविसंमेलनाचे संयोजक विलास वानखडे ,अमोल पल्हाडे व समस्त कार्यकारीणी पदाधिकारी विदर्भ सहयोग मंडळ निगडी पुणे यांनी यशवितेसाठी विशेष परीश्रम घेतले.


