देश - विदेश

तबला वादक जाकीर हुसेन काळाच्या पडद्याआड

अजित पवारांकडून दुःख व्यक्त

जगप्रसिद्ध तबला वादक जाकीर हुसेन यांचे अमेरिकेतील सॅन फ्रँसिसको मध्ये दि.15 रोजी निधन झाले.ते काही दिवसापासुन आजारी होते. त्यांच्या जाण्याने कला क्षेत्रात शोककाळा पसरली. ते 73 वर्षाचे होते. त्यांच्या जाण्याने तबला पोरका झाला.

झाकीर हुसैन ( Zakir Hussain ) हे सुप्रसिद्ध तबलावादक अल्लाह राखा खान यांचे पुत्र आहेत. झाकीर हुसैन यांनी अनेक भारतीय आणि परदेशी चित्रपटांना संगीत दिलं आहे. ‘साझ’ या सिनेमात त्यांनी अभिनयही केला आहे. झाकीर हुसैन यांनी वडील अल्लाह राखा खान यांच्यासह तबला वादनाचे धडे वयाच्या सातव्या वर्षापासून गिरवण्यास सुरुवात केली.

त्यांना भारताकडून पद्मश्री, पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले असून अति प्रतिष्ठित असलेला ग्रॅमी पुरस्कार त्यांना प्राप्त झालेला आहे.

संगीत क्षेत्राचे नुकसान,- अजित पवार

हिंदुस्तानी शास्त्रीय संगीतातील सुप्रसिद्ध तबलावादक, संगीत दिग्दर्शक आणि तालवाद्यवादक उस्ताद झाकीर हुसेन यांच्या निधनाची अत्यंत दुःखद बातमी कळली. त्यांच्या निधनामुळे जागतिक आणि भारतीय संगीत क्षेत्रात भरून न निघणारे नुकसान झाले आहे.

मी उस्तादजींच्या स्मृतीला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या व आप्तस्वकियांच्या दुःखात सहभागी आहे.
अशा शब्दात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी x वर दुःख व्यक्त केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button