पिंपरी चिंचवड

प्राप्त वैभवाचा त्याग करण्यात खरा पुरुषार्थ- अमोघकिर्ती महाराज

दिगंबर जैन एकता मंडळाच्या मंदिरात पार्श्वनाथ मूर्ती प्रतिष्ठापणा

पिंपरी(प्रतिनिधी) आपण संपत्ती किंवा सुखवाह वस्तूंमध्ये अडकून बसतो. त्यांना घट्ट कवटाळून बसतो.वैभव कमावणे फार मोठी बाब नाही, मात्र प्राप्त केलेल्या वैभवाचा त्याग करण्यतात मोठा पुरुषार्थ आहे, असे मत श्री 1008 अमोघकीर्ती महाराज यांनी व्यक्त केले.
पिंपरी येथील (मासूळकर कॉलनी) दिगम्बर जैन एकता मंडळाच्या वतीने आयोजित मुलनायक श्री 1008 चिंतामणी पार्श्वनाथ तीर्थणकर मूर्तीचे पंच कल्याण प्रतिष्ठा महा महोत्सवात “भगवान पार्श्वनाथ यांचा दिक्षा कल्याणक “या विषयावर ते बोलत होते. यावेळी बोलत ते होते.

यावेळी प.पू श्री 1008 अमरकीर्ती महाराज,अध्यक्ष डॉ विलास लोहाडे, उपाध्यक्ष किरण कोळेकर, सचिव अनंत दोशी, सह सचिव संकेत शहा, खजिनदार विजय कमते, सहखजिनदार शांतीनाथ मगदूम आदी उपस्थित होते.
पुढे ते म्हणाले कि, आपल्याकडे थोडेफार पैसे आले की आपण दिनदुबळे किंवा नोकरांचा कठोर शब्दात अपमान करतो.आपण आपली नैतिकता विसरतो, मात्र आपली वाणी मधुर ठेवली पाहिजेत. मन तन स्वछ , सद व्यवहार, स्वच्छ चरित्र, सदविचार आचरणात आणले पाहिजेत. तीर्थंकर हे दिक्षा प्राप्ती नंतर आपल्या सर्व घरदार, संसाराचा त्याग करतात. पुन्हा घरी कधीच परत येत नाही. आपण मात्र दीक्षा घेण्याचा हा विचार सुद्धा करणेसुद्धा कठीण जाते, तर प्रत्यक्ष दीक्षा घेतल्यावर किती कठीण होईल? आपण एवढे कम्फर्ट झोनमध्ये जगतो की आपले जीवन कन्फर्ट होऊन बसले आहे.आपण किती स्टॅंडर्ड जगलो तरी हे सर्व मातीमोल आहे . भगवान पार्श्वनाथ हे युवराज असताना त्यांची वाणी मधुर होती.त्यांच्या मनात दया होती, विशाल साम्राज्याचे मालक असतानाही ते त्यागी, सन्यासी बनून जगले .त्यांनी कठोर शब्द प्रयोग केला नाही, ते दयेचा सागर होते.
सकाळच्या दरम्यान उद्यमनगर, मासूळकर कॉलनी परिसरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button